शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपूनही कृपलानीचे अतिक्रमण कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:16 IST

नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूनी अवैध जागेवर हॉटेलचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम अवैध असल्याचे पालिकेने नोटीस बजाविताना मान्य केले असले तरी नोटीसची मुदत संपल्यानंतर कृपलानीचे बांधकाम पाडण्यात आले नाही.

ठळक मुद्देतहसीलदारांनी मुख्याधिकाऱ्यांना बजाविला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूनी अवैध जागेवर हॉटेलचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम अवैध असल्याचे पालिकेने नोटीस बजाविताना मान्य केले असले तरी नोटीसची मुदत संपल्यानंतर कृपलानीचे बांधकाम पाडण्यात आले नाही. कृपलानीच्या बांधकामावर कारवाई रोखण्यासंदर्भात मुख्याधिकाºयांवर कुणाचा दबाव आहे यांची चर्चा शहरात सुरू झाली आहे.बाराशे विद्यार्थीनी शिकत असलेल्या केसरीमल कन्या शाळेच्या आवारात भरत ज्ञान मंदिरम् ही दुसरी एक शाळा आहे. वुमेन्स एज्युकेशन सोसायटीची कुठलीही परवानगी (नाहरकत प्रमाणपत्र) न घेता कृपलानीने येथे अवैधरित्या हॉटेलचे बांधकाम सुरू केले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना सिपीसी ८० अंतर्गत नोटीस येथील रहिवासी अ‍ॅड.रवींद्र गुरू यांनी नोटीस बजाविला त्यातंर्गत ६० दिवसाचा कालावधी जिल्हा प्रशासनाला मिळाला होता.. तो कालावधी संपलेला आहे. त्यामुळे कृपलानीच्या अवैध अतिक्रमणावर पालिकेने बुलडोजर चालविणे गरजेचे होते. परंतू जिल्हाधिकाºयांनी उपविभागीय अधिकारी यांना कारवाई बाबत सुचना केली. व उपविभागीय अधिकाºयांनी रजा काळात तहसीलदार वर्धा यांना कारवाई बाबत अधिकार दिले. त्यानंतर तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी शिवा संघटनेचे जिल्हा प्रमुख सुरेश पट्टेवार व एकनाथ उरकुडे यांच्या नोटीसनंतर ७ जानेवारी रोजी मुख्याधिकारी नगर परिषद वर्धा यांना चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र अजुनही मुख्याधिकाºयांनी कारवाई केलेली नाही. यापुर्वी मुख्याधिकाºयांनी कृपलानी यांना दोन वेळा नोटीस बजावून कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते. मात्र कृपलानी यांनी कोणतेही कागदपत्र सादर केले नाही. मुख्याधिकाºयांच्या नोटीसला थातुर-मातूर उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या नोटीस नंतर आता कृपलानीला दिलेला वेळ निघुन गेला आहे. परंतु कृपलानीचे अतिक्रमण कायम आहे. त्यामुळे पुन्हा ११ जानेवारी २०१९ ला जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना अ‍ॅड.रवींद्र गुरू यांनी स्मरणपत्र (रिमांन्डर नोटीस) बजाविला. तसेच नगरचना अधिनियम १९६५ अन्वये ३०४ अंतर्गत मुख्याधिकाऱ्यांना नोटीस दिला. कृपलानीला दिलेला ३० दिवसाचा कालावधी संपल्यावरही कारवाई पालिकेने केली नाही. ही कारवाई कोणी रोखून धरली हा प्रश्न निर्माण झाला आहे.स्वत:च पाडले पायऱ्यांचे बांधकामया वादग्रस्त इमारतीचे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल होण्याच्या स्थितीत असतांना पालिकेने अवैध अतिक्रमणाला प्रचंड मोठे अभय देण्याची भुमिका घेतलेली आहे. दरम्यान मंगळवार कृपलानीने स्व:हाच इमारतीच्या पायºया तोडण्याचे काम केले. पालिकेने ही संपूर्ण इमारत अवैध असल्याने पाडावी अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार