शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

दुःखद! शेतकऱ्यांच्या हितासाठी धडपडणारा 'रॅन्चाे' २० व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 12:37 IST

Wardha News विदर्भातील एक जुगाडू ‘रॅन्चाे’ गेल्या काही दिवसांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेला. त्या घटनेची शाई वाळते न वाळते ताेच आणखी एक विदर्भातीच रॅन्चाे काळाने हिरावून घेतला.

ठळक मुद्देशोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कारतंत्रनिकेतनमध्येही गिरविले हाेते धडे

राजेश साेलंकी

 लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : ‘रॅन्चाे’ असा उल्लेख केला तरी आपल्या डाेळ्यासमाेर ‘थ्री इडियट्स’मधला फुंगसुक वांगडू आठवताे. आपल्या कल्पक बुद्धीने जुगाड तंत्र तयार करण्यात ताे तरबेज... असे अनेक तरुण आता पुढे येत आहे. असाच हेलिकॉप्टर बनवणारा विदर्भातील एक जुगाडू ‘रॅन्चाे’ गेल्या काही दिवसांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेला. त्या घटनेची शाई वाळते न वाळते ताेच आणखी एक विदर्भातीच रॅन्चाे काळाने हिरावून घेतला. हा रॅन्चाे कृषि आणि गावविकासासाठी झपाटलेला हाेता, हे विशेष! (Another 'rancho' struggling for agricultural development is behind the scenes)

अभिजित प्रशांत वंजारी (२०) रा. मांडवा, ता. आर्वी, जि. वर्धा असे या जुगाडू रॅन्चाेचे नाव. पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या वर्षाला पिंपरी मेघे कॉलेजमध्ये ताे शिकत हाेता. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या अभिजितला परिस्थितीची जाणीव हाेती आणि शेतकऱ्यांचे हाेणारे हाल हे त्याला पाहवत नव्हते. त्यातूनच ताे शेतीत राबायच आणि शेतकऱ्यांसाठी विविध प्रयाेग करून छाेट्या - छाेट्या तुकड्यांमधून यंत्र तयार करीत हाेता. यासाठी त्याने तंत्रनिकेतनमध्येही धडे गिरवले. अलीकडेच त्याने तुरीचे पीक बहरावे, त्या तुरीला आणखी फांद्या फुटून फुलं आणि त्यानंतर अर्थातच उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी तुरीचे शेंडे (वरील भाग) कापण्यासाठी यंत्र तयार केले. बाजारात असलेले अशाचप्रकारे यंत्र कितीतरी महाग असल्याने शेतकरी ते यंत्र घेण्यापासून वंचित राहात. ही बाब ओळखून त्याने शेतीसाठी तसेच पण छाेटेसे यंत्र तयार केले.

गावातील अनेक गरीब गरजू शेतकऱ्यांना अत्यल्प दरात त्याने ते विकले. परंतु त्याच यंत्राने त्याचा घात केला. गुरुवारी ताे त्याच यंत्राने शेतात तुरीची खुडणी करीत हाेता. परंतु नियतीने वेगळेच काही लिहून ठेवले हाेते. त्याच यंत्राचे नटबाेल्ट तुटले आणि त्या मशीनचे ब्लेड थेट त्याच्या पाेटात खुपसले. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.  शुक्रवारी त्याच्या गावात शाेकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. फुलसावंगी (जि. यवतमाळ) येथील हेलिकाॅप्टर ऊर्फ इस्माईल शेख या उमद्या तरुणाच्या अकाली एक्झिटनंतर मनाला चटका लावणारी ही घटना आहे. विदर्भाने अवघ्या एका महिन्यात दाेन कल्पक अशा रॅन्चाेला गमावले.

असे हाेते त्याचे वेगवेगळे प्रयाेग

कुलरच्या मदतीने मदतीने त्याने स्प्रिंकलर तयार केले होते. त्यासाेबतच शेतातील साहित्य डोक्यावरून घरी आणताना शेतकऱ्यांना होणारा त्रास पाहून त्याने दुचाकीवर ट्रॉली तयार केली होती. स्वयंपाक घरात भाजी फोडणी घालताना किंवा गॅसमुळे तयार होणारी गरम हवा बाहेर निघून जावी; आईला त्रास होऊ नये यासाठी त्याने स्वयंपाकघरात गॅसवरील चिमणी तयार केली होती. ती अद्यापही त्याच्या घरी आहे. त्यामध्येही त्या माॅडिफिकेशन करावयाचे हाेते.

स्कूटरवरची ट्रॅक्टरची छोटी ट्रॉली तयार केली होती. इलेक्ट्रिक फिटिंग असो की कोणतीही फिटिंग असो की स्प्रिंकलर फिटिंग असो इतर प्रकारची; सर्व प्रकाराची फिटिंग ताे स्वत:च करायचा. शेतात वेगवेगळे प्रयोग करायचा. इस्रायल पद्धतीने शेती करण्याचा त्याचा ध्यास होता. गुरुदेव सेवा मंडळात तो नेहमी कार्यरत असायचा. तुकडोजी महाराजांची समाधी मोझरीला जशी आहे तशी समाधीची हुबेहूब प्रतिकृती त्याने गावात तयार केली हाेती. त्यातही त्याची तळमळ यासाठी की गावातील नागरिकांना दूरवर जाताना हाेणारा त्रास कमी व्हावा.

घरचा विद्युतपुरवठा खंडित झाला तर कुठलेही बटन न दाबता आपोआप लाईट लागेल असे नवीन तंत्र त्याने तयार केले होते, अशी माहिती कुटुंबाचे आप्तेष्ट रुपाली जाधव यांनी दिली. तर टेंभरी (परसाेडी) गावाला वाॅटर कप स्पर्धेतही त्याने मदत केली हाेती. त्यामुळे त्याला जलयाेद्धा म्हणूनही ओळखले जात, असे वॉटर कप स्पर्धेचे तालुका समन्वयक निखिल आंबुलकर यांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यू