शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा वार्षिक आराखडा २५० कोटींचा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

जिल्ह्याच्या विकासासाठी असणारा जिल्हा वार्षिक आराखडा २५० कोटी रुपयांपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांचे आराखडे सुधारित करावेत. त्याचबरोबर जिल्हा विकास आराखड्यातून होणाऱ्या सर्व विकास कामांचे छायाचित्र आणि व्हिडिओ तयार करून ठेवावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे । आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झालेल्या जुन्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा नवीन कार्यक्रम आला आहे. जिल्ह्यात झालेल्या १ हजार ७६ कि.मी. मधील जुन्या आणि खराब रस्त्यांचे आराखडे खासदार आणि आमदार यांच्या मान्यतेने तयार करून मंजुरीसाठी पाठवावेत. जिल्ह्याच्या विकासासाठी असणारा जिल्हा वार्षिक आराखडा २५० कोटींपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांचे आराखडे सुधारित करावेत, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर आदींची उपस्थिती होती.जिल्ह्याच्या विकासासाठी असणारा जिल्हा वार्षिक आराखडा २५० कोटी रुपयांपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांचे आराखडे सुधारित करावेत. त्याचबरोबर जिल्हा विकास आराखड्यातून होणाऱ्या सर्व विकास कामांचे छायाचित्र आणि व्हिडिओ तयार करून ठेवावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अनेक गावांत बस जात नाही आणि त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो तसेच वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वहिवाटीसाठी असणाऱ्या पांदण रस्त्यांचा विषय आमदार डॉ. पंकज भोयर पालकमंत्री पांदण रस्ते समितीसमोर ठेवला. त्यावर समितीने या आराखड्यास मंजुरी दिली. तसेच यासाठी १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल, असे ना. बावनकुळे यांनी सांगितले. सोबतच पुढील १५ दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आणि रस्ते दुरुस्त करावेत, असे निर्देश बावनकुळे यांनी बांधकाम विभागाला दिलेत.जिल्हा परिषद व नगर परिषदेअंतर्गत झालेल्या पाच वर्षांतील कामांचे परीक्षण करण्यासाठी चमू पाठविण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, धरणांची पाणी पातळी, पुरामुळे व अतिवृष्टीमुळे झालेली मनुष्यहानी, घर, जनावरे आदींचे नुकसान आणि दिलेले आर्थिक सहाय्य याबाबत माहिती दिली. शिवाय यावर्षी खरिपाच्या लागवड क्षेत्रात १६ हजार हेक्टरने वाढ झाल्याचेही सांगितले. यात बैठकीला जिल्हा प्रशासनातील विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

टॅग्स :PMRDAपीएमआरडीएChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे