संतापजनक; वर्धा जिल्ह्यात विषप्रयोग करून सहा मोरांना मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 16:07 IST2021-04-29T16:06:47+5:302021-04-29T16:07:12+5:30
Wardha news थार-पार्डी रस्त्यावर असलेल्या थार जंगलात आड नाल्याजवळ पाण्यामध्ये विष प्रयोग करून सहा मोरांना मारल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.

संतापजनक; वर्धा जिल्ह्यात विषप्रयोग करून सहा मोरांना मारले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: थार-पार्डी रस्त्यावर असलेल्या थार जंगलात आड नाल्याजवळ पाण्यामध्ये विष प्रयोग करून सहा मोरांना मारल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी वनविभागाने पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जंगलामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीमध्ये शिकारी वन्यप्राण्यांना टार्गेट करीत आहे. याच हेतूने काही शिका?्यांनी आड नाल्यामध्ये वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी ठेवले. या पाण्यामध्ये विष प्रयोग केला. सदरचे पाणी मोर या प्राण्यांनी प्राशन केले आणि त्यातूनच एकापाठोपाठ सहा मोरांचा मृत्यू झाला.
सदरची घटना वनविभागाला माहिती होताच वनपरिक्षेत्राधिकारी सुहास पाटील व त्यांच्या अधिनस्त चमूने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मोरांचे छवविच्छेदन करण्यासाठी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली कांबळे यांना बोलविले. डॉक्टर कांबळे यांनी पंचनामा करुन शवविच्छेदन केले. असून काही अवयव प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहे. प्रयोग शाळेमधून रिपोर्ट आल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. आष्टी जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वन्यप्राणी आहे. मात्र शिका?्यांच्या पथ्यावर असल्याने एकापाठोपाठ असंख्य मोर, ससा, हरीण या प्राण्यांची शिकार होत असल्याच्या घटना अलीकडेच उघडकीस आले आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांची शिकार करणा?्या विरोधात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.