शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘अंकिता’ला मिळाला द्वितीय स्मृतिदिनी न्याय; १० फेब्रुवारी २०२०ला नागपूरला मालवली होती प्राणज्योत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 08:34 IST

हिंगणघाट येथील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी बसमधून उतरल्यावर पीडिता ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना, आरोपी विकेश याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली केले.

भाष्कर कलोडे - 

हिंगणघाट (जि. वर्धा) :  हृदयाला चटका लावणाऱ्या हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा निकाल अखेर गुरुवारी दुपारी लागला. १५० पानांच्या निकालात न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला आजन्म सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. मृत प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे हिला तिच्या द्वितीय स्मृतिदिनी या निकालाने न्याय मिळाला.हिंगणघाट येथील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी बसमधून उतरल्यावर पीडिता ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना, आरोपी विकेश याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली केले. गंभीर जखमी पीडितेची नागपूर येथील रुग्णालयात १० फेब्रुवारी २०२० ला प्राणज्योत मालवली. नेहमी वर्दळ राहणाऱ्या चौकातच घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला होता. घटनेचे राज्यात विविध ठिकाणी पडसादही उमटले.

कठोर मनाने ऐकला आरोपीने निकालहिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला गुरुवारी न्यायालयात आणण्यात आले हाेते. न्यायालयाने दिलेला निकाल विकेश याने कठोर मन करून ऐकला. निकाल ऐकल्यावर विकेश याची स्थिती सामान्य होती. निकाल जाहीर झाल्यावर कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून सायंकाळी पाच वाजता विकेशची पोलीस बंदोबस्तात कारागृहात रवानगी करण्यात आली.दारोडा गावावर पोलिसांचा वॉचजळीत प्रकरणातील पीडिता अंकिता आणि विकेश हे दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावातील रहिवासी असल्याने निकालानंतर गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तेथे तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हिंगणघाट जळीत प्रकरणाचा गुरुवारी हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास केल्यावर पुढील निर्णय घेऊ. - ॲड. उज्ज्वल निकम, विशेष शासकीय अभियोक्ता.

निकालाच्या प्रती मिळाल्यावर आपण त्याचा बारकाईने अभ्यास करून विकेश नगराळे याला न्याय मिळून देण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागू. - ॲड. भूपेंद्र सोने, आरोपीचे वकील

निकालाने समाधानीअंकिताला जिवंत जाळणाऱ्या विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला न्यायालय फाशीची शिक्षा देईल, अशी आशा होती; पण गुरुवारी न्यायालयाने दिलेल्या या निकालाचे आपण स्वागतच करतो.     - अरुण पिसुड्डे, मृत अंकिताचे वडील 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरCourtन्यायालय