वर्ध्यात अंगणवाडी सेविकांनी काढली राज्य सरकारच्या आश्वासनांची प्रतिकात्मक तिरडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 16:21 IST2017-09-18T13:58:51+5:302017-09-18T16:21:44+5:30
वर्धा, दि. 18 - महाराष्ट्रात राज्य अंगणवाडी कर्मचारी कामगार संघटनेच्या शेकडो महिलांनी स्थानिक ठाकरे मार्केट चौकातून आज वर्धा शहरात ...

वर्ध्यात अंगणवाडी सेविकांनी काढली राज्य सरकारच्या आश्वासनांची प्रतिकात्मक तिरडी
वर्धा, दि. 18 - महाराष्ट्रात राज्य अंगणवाडी कर्मचारी कामगार संघटनेच्या शेकडो महिलांनी स्थानिक ठाकरे मार्केट चौकातून आज वर्धा शहरात मोर्चा काढला. यावेळी राज्य सरकारने आजवर दिलेल्या आश्वासनांची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय महिला बालविकास मंत्री व राज्याच्या महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आठही तालुक्यातील व शहरी भागातील ५०० वर अधिक अंगणवाडी महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
या मोर्चाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नगरसेवक यशवंत झाडे व अंगणवाडी महिला संघटनेच्या अध्यक्ष आयशा शेख यांनी केले.