धुमनखेडा येथील अंगणवाडीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:31 IST2018-08-18T22:30:07+5:302018-08-18T22:31:06+5:30
पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गंत येत असलेल्या धुमनखेडा येथील अंगणवाडीची अत्यंत दुरवस्था झालेली आहेत. सदर अंगणवाडीची संपूर्ण देखरेख ही ग्रामपंचायत (चाहोरी) कडे आहे. या अंगणवाडीची स्थिती जर्जर झाली आहे. त्या अंगणवाडीच्या भिंतीचे प्लास्टर झालेले नसून छतावरून दररोज रेतीचे पापुद्रे निघतात. त्याच छताखाली लहान मुले बसतात.

धुमनखेडा येथील अंगणवाडीची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गंत येत असलेल्या धुमनखेडा येथील अंगणवाडीची अत्यंत दुरवस्था झालेली आहेत. सदर अंगणवाडीची संपूर्ण देखरेख ही ग्रामपंचायत (चाहोरी) कडे आहे. या अंगणवाडीची स्थिती जर्जर झाली आहे. त्या अंगणवाडीच्या भिंतीचे प्लास्टर झालेले नसून छतावरून दररोज रेतीचे पापुद्रे निघतात. त्याच छताखाली लहान मुले बसतात. लहान मुलांच्या पालकांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली त्यावेळी पालकांनी या बाबतची तक्रार ग्रामपंचायत व पंचायत समिती समुद्रपूर येथे दिली असता याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही.
त्यामुळे संतप्त पालकांनी आपल्या पाल्याना यापुढे अंगणवाडीत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या वागणुकीबाबत सुध्दा पालकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे याबाबीकडे प्रशासनाने विशेष लक्ष देऊन यावे नागरिक, पालक यांना न्याय द्यावा अशी मागणी पालकांकडून होत आहे. धुमनखेडा गावात रस्ते व इतर अनेक समस्या आहेत. परंतु याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
इमारतीचे काम अर्धवट
समुद्रपूर तालुक्यात शासकीय निधीतून अनेक ठिकाणी अंगणवाडी इमारती बांधकाम करण्यात आले. यासाठी निधीही मंजूर करण्यात आला. कंत्राटदारांनी निधीची उचल केली परंतु इमारतीचे काम अपूर्णच ठेवले. त्यामुळे अनेक या कामांबाबत तक्रारी वाढल्या आहेत.