टायर फुटल्याने अनियंत्रित कार दुसऱ्या कारवर धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 05:00 AM2022-04-18T05:00:00+5:302022-04-18T05:00:10+5:30

एम. एच. ३२ ए. एस. ०६८७ क्रमांकाची कार वर्धेकडून   नागपूरकडे जात होती. दरम्यान, माहूर येथे देव दर्शनासाठी जात असलेल्या एम. एच. ४० सी. ए. ४२६७ क्रमांकाच्या कारचा नागपूर-यवतमाळ मार्गावरील मामा-भांजा दर्गाह समोर उजव्या बाजूचा समोरील टायर फुटल्याने ती कार अनियंत्रित होऊन थेट रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली आणि चक्क वर्ध्याकडून नागपूरकडे जाणाऱ्या एम.एच. ३२ ए. एस. ०६८७ क्रमांकाच्या कारवर जाऊन धडकली.

An uncontrolled car collided with another car due to a flat tire | टायर फुटल्याने अनियंत्रित कार दुसऱ्या कारवर धडकली

टायर फुटल्याने अनियंत्रित कार दुसऱ्या कारवर धडकली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : भरधाव कारचा समोरील टायर फुटल्याने कार दुभाजकावर जाऊन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कारवर जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात सातजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.१७) सकाळी १०.३६ वाजण्याच्या सुमारास वर्धा-नागपूर रस्त्यावर असलेल्या मामा-भांजा दर्गाह समोर झाला. 
अपघातात  गंभीर जखमी झालेल्यांत  रमेशराज कपाटे (६०), शिला कृष्णराज कपाटे (५५), चेताबाई कपाटे (७०), कोमल कृष्णराज कपाटे (२१), योगेश कपाटे (२५) सर्व, रा. पारशिवणी जि. नागपूर यांचा समावेश आहे. तर नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कारमधील दोन जखमींची नावे वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाली नव्हती.
प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ३२ ए. एस. ०६८७ क्रमांकाची कार वर्धेकडून   नागपूरकडे जात होती. दरम्यान, माहूर येथे देव दर्शनासाठी जात असलेल्या एम. एच. ४० सी. ए. ४२६७ क्रमांकाच्या कारचा नागपूर-यवतमाळ मार्गावरील मामा-भांजा दर्गाह समोर उजव्या बाजूचा समोरील टायर फुटल्याने ती कार अनियंत्रित होऊन थेट रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली आणि चक्क वर्ध्याकडून नागपूरकडे जाणाऱ्या एम.एच. ३२ ए. एस. ०६८७ क्रमांकाच्या कारवर जाऊन धडकली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेला पाचारण करून सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारांसाठी पाठविले. तर देव दर्शनाला जाणाऱ्या कपाटे कुटुंबातील सदस्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली.  अपघात इतका भीषण होता की, दोन्ही कारचा चक्काचूर झाला. तीन जखमींना बसपाचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार, अनोदर्शी भैसारे, दीपक भगत, दिनेश वाणी, राहुल काशिकर, राहुल खोब्रगडे यांनी रुग्णालयात पाठविण्यासाठी मदत केली. अपघाताची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

 

Web Title: An uncontrolled car collided with another car due to a flat tire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात