अमेरिकन जॉन स्लेटने घेतला डवरे चालविण्याचा अनुभव
By Admin | Updated: August 2, 2015 02:44 IST2015-08-02T02:44:37+5:302015-08-02T02:44:37+5:30
अमेरिकन सरकारचे भारत, बांग्लादेश, श्रीलंका या देशांना अॅग्रिकल्चर सर्व्हिसेस देणारे कृषी क्षेत्राशी संलग्नित

अमेरिकन जॉन स्लेटने घेतला डवरे चालविण्याचा अनुभव
पिकांचीही केली पाहणी : तंत्रज्ञान, बीजोत्पादन व डेअरी फार्मिंगसह शेती व्यवस्थानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वर्धा : अमेरिकन सरकारचे भारत, बांग्लादेश, श्रीलंका या देशांना अॅग्रिकल्चर सर्व्हिसेस देणारे कृषी क्षेत्राशी संलग्नित जॉन स्लेट व अमेरिकन अॅम्बेसीचे अॅग्रिकल्चर स्पेशालिस्ट भारतीय अमित आरध्य नवी दिल्ली यांनी कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे भेट दिली. याप्रसंगी जॉन स्लेट यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या शेतामध्ये डवरे चालविण्याचा अनुभव घेतला. यावेळी विविध पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विदर्भातील कापूस व सोयाबीन उत्पादक, हवामान, गत दोन-तीन वर्षांपासून पिकांवर हवामानाचा होणारा दुष्परिणाम, पीक परिस्थिती, किड व रोग व्यवस्थापन आदींबाबत जॉन स्लेट व अमित आरध्य यांनी डॉ. प्रदीप दवने यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी कृषी महाविद्यालय नागपूर येथील कृषी कार्यानुभव (रावेचे) विद्यार्थ्यांनीही जॉन स्लेट यांच्याशी कृषी विषयक समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. शिवाय शेतावर प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा घडवून आणली. याप्रसंगी नरेश ढोकणे, शेतकरी रमेश ढोकणे ईसापूर यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशी पिकांची पाहणी केली. यावेळी कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान, बिजोत्पादन व डेअरी फार्मिंगबाबत चर्चा शेतकरी, विद्यार्थी व शास्त्रज्ञांशी चर्चा केली. जॉन स्लेट व अमित आरध्य यानी यवतमाळ, अमरावती परिसरातील शेतकऱ्यांचीही भेट घेत मुंबईला प्रस्थान केले.(कार्यालय प्रतिनिधी)