रुग्णवाहिकेचे दर झाले आता निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:00:07+5:30

प्राधिकरणाने रुग्णवाहिकेचे दराबाबत निरीक्षण करुन अहवाल सभेत मांडावा असे ठरविण्यात आले. सभेतील ठरावानुसार जिल्हयातील रुग्णवाहिकांचे योग्य दर ठरविण्याकरीता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी यवतमाळ, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचा भाडेदरांचा अभ्यास करुन जिल्ह्यातील दर ठरविण्यात आले. दर निश्चित झाल्याने आता रूग्ण व त्यांच्या नातेवाईक यांची फसवणूक टळली जाणार आहे.

Ambulance rates are now fixed | रुग्णवाहिकेचे दर झाले आता निश्चित

रुग्णवाहिकेचे दर झाले आता निश्चित

ठळक मुद्देउच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने केली घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यातील रुग्णसेवा देणाऱ्या रुग्ण वाहिकेचे दर निश्चित करण्यासाठी मुबंई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने परिवहन आयुक्त कार्यालयाने जिल्हा स्तरीय प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीला जिल्हयातील रुग्ण वाहिकेचे दर निश्चित करण्यासाठी निर्देश दिले आहे. त्यामुळे जिल्हयातील शहर व ग्रामीण परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी आणि गंभीर आजाराने ग्रस्त तसेच कोविड १९ आजाराचा प्रसार होण्याची शक्यता वाढल्यामुळे आजारी व्यक्तींना तात्काळ पोहोचविण्याकरीता जिल्हयातील खाजगी रुग्ण वाहिकेचे भाडे दर निश्चित करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत प्राधिकरणचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली व सदस्याच्या सवार्नुमते निश्चित करण्यात आले आहे. प्राधिकरणाने रुग्णवाहिकेचे दराबाबत निरीक्षण करुन अहवाल सभेत मांडावा असे ठरविण्यात आले. सभेतील ठरावानुसार जिल्हयातील रुग्णवाहिकांचे योग्य दर ठरविण्याकरीता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी यवतमाळ, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचा भाडेदरांचा अभ्यास करुन जिल्ह्यातील दर ठरविण्यात आले. दर निश्चित झाल्याने आता रूग्ण व त्यांच्या नातेवाईक यांची फसवणूक टळली जाणार आहे.

तीन जिल्ह्यांच्या दराचा केला अभ्यास
मार्च महिन्यापासून देशभर कोविड आजाराने थैमान घातले आहे. रूग्ण संख्या लाखांवर पोहचली असून कोरोना पॉझिव्हीह रूग्णांना त्यांच्या घरापासून ते रूग्णालयापर्यंत आणण्यासाठी शासकीय, खासगी रूग्णवाहिकेचा वापर केला जात आहे. बरेच रूग्ण हे बाहेर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम व सांवगी (मेघे) येथील रूग्णालयात दाखल होतात. त्यांना येथे येण्यासाठी रूग्णवाहिका लागते. बरेच वेळा रूग्णांच्या नातेवार्इंकाना रूग्णवाहिकेसाठी ताटकळत राहावे लागत होते. किंवा दराबाबत घासाघासी करावी लागत होती. त्यामुळे दर निश्चित करण्यापूर्वी विदर्भातील तीन जिल्ह्यातील दरांचा वर्धा जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधीकरणाने अभ्यास करून सदर दर निश्चित केले आहेत. आता रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल.

वर्धा जिल्ह्यासाठी असे ठरले आहेत दर
नगर परिषदेच्या हद्दीमध्ये १ ते २५ कि.मी. पर्यंत मारुती रुग्णवाहिकेसाठी ६०० रुपये, टाटा सुमो -७०० रुपये, बिंगर ८०० रुपये टेम्पो ट्रॅव्हलर १ हजार रुपये, वर्धा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये किंवा हद्दीबाहेर प्रति किमी. मारुती व टाटा सुमो १२ रुपये , बिंगर १८ रुपये, टेम्पो ट्रॅव्हलर २२ रुपये, इंधनसहित एक महिन्याचे २ हजार कि.मी. पर्यंत मारुती ४५ हजार रुपये, टाटासुमो ४७ हजार रुपये, बिंगर ५५ हजार रुपये व टेम्पो ट्रॅव्हलर ६० हजार रुपये भाडे दर निश्चित करण्यात आले असून वातानुकुलित यंत्रणा बसविली असल्यास याव्यतिरिक्त १० टक्के अतिरिक्त दरवाढ देण्यात येईल. तसेच २ हजार कि.मी. च्या पुढील प्रती कि.मी.करीता ९ रुपये प्रति कि.मी. प्रमाणे भाडे दर निश्चित करण्यात आला आहे.
 

Web Title: Ambulance rates are now fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.