पोलिसांच्या वाहनांवरील ‘अंबर’ दिवे कायमच

By Admin | Updated: May 27, 2014 23:56 IST2014-05-27T23:56:29+5:302014-05-27T23:56:29+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार शासकीय वाहनांवर लावावयाच्या दिव्यांबाबत नव्याने आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. हे आदेश प्राप्त होताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व उपप्रादेशिक परिवहन

'Amber' lights on police vehicles will always be there | पोलिसांच्या वाहनांवरील ‘अंबर’ दिवे कायमच

पोलिसांच्या वाहनांवरील ‘अंबर’ दिवे कायमच

वर्धा : सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार शासकीय वाहनांवर लावावयाच्या दिव्यांबाबत नव्याने आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. हे आदेश प्राप्त होताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांच्या वाहनांवरील दिवे निळे झाले; पण पोलीस विभागातील अन्य वाहनांवरील अंबर दिवे अद्यापही कायम असल्याचेच दिसून येते.

शासनामध्ये महत्त्वाच्या पदांवरील अधिकार्‍यांसह मंत्र्यांच्या वाहनांवर अंबर दिवे लावले जात होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राज्य शासनाने वाहनास दिवा लावण्याबाबत नव्याने नियम आणि आदेश जारी केले गेले आहेत. यात पोलीस यंत्रणा, महसूल अधिकार्‍यांच्या वाहनांनाही दिवे लावण्याबाबत नियम घालून देण्यात आले आहेत. या नियमानुसार पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकार्‍यांसह यंत्रणेतील शासकीय वाहने, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकार्‍यांच्या वाहनावर फ्लॅशरविना निळा दिवा वापरावा, असे आदेश आहे. या आदेशाबाबतचे वृत्त उमटल्यानंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या वाहनांवरील जुने अंबर दिवे काढून निळे दिवे बसविण्यात आले. पोलीस यंत्रणेतील बहुतांश वाहनांवर मात्र आजही जुनेच अंबर दिवे कायम असल्याचे दिसून येते. पोलीस अधीक्षकांच्या वाहनावरील अंबर दिवा निघून निळा दिवा आला असताना त्यांच्याच विभागातील अन्य वाहनांवर अंबर दिवे कसे, असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.

शासनाने दिलेल्या आदेशानुसार वाहनांच्या टपावरील दिवे बदलण्याबाबत सर्व अधिकार्‍यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी पत्र पाठविले आहे. शिवाय या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे नमूद करण्यात आले. यास पत्रानंतरही संबंधित विभागांनी दिवे बदलले नाही तर केंद्रीय मोटार वाहन नियम १0८ (१) व ११९ चा भंग समजाला जाणार आहे. संबंधित प्रशासकीय विभागास शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची भूमिका आरटीओने घेतली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 'Amber' lights on police vehicles will always be there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.