अमर काळे यांच्यावर मध्यप्रदेशातील निवडणुकीची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:50 IST2018-11-06T23:50:06+5:302018-11-06T23:50:27+5:30
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आर्वी विधान सभा क्षेत्राचे आमदार अमर शरदराव काळे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे निरीक्षक म्हणुन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अमर काळे यांच्यावर मध्यप्रदेशातील निवडणुकीची जबाबदारी
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पं.) : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आर्वी विधान सभा क्षेत्राचे आमदार अमर शरदराव काळे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे निरीक्षक म्हणुन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. काळे मध्यप्रदेश येथील मांडला व दिंडोरी जिल्ह्याचे निरीक्षक म्हणुन काम पाहणार आहेत मध्यंतरी आमदार काळे यांना तातडीने दिल्लीला बोलाविण्यात आले होते. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना मध्यप्रदेश येथील मांडला जिल्ह्यातील चार विधानसभा तथा डिंडोरी जिल्ह्यातील विधानसभाचे निरीक्षक म्हणून नियुक्त केल्याचे सांगितले.
त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आमदार काळे हे लवकरच मध्यप्रदेश येथील डिंडोरी आणि मांडला या जिल्ह्याचे दौरे करणार आहेत. या दरम्यान कॉंग्रेस पार्टीचे विधानसभा निहाय उमेदवार नियुक्त करणार असुन प्रचार करण्यासाठी ते लक्ष केंद्रीत करणार असल्याचे समजते. याच दरम्यान कॉँग्रेस पार्टीतील काही नाराज नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना समजावणीचे कामही ते करणार आहेत. अलिकडे दिल्ली येथील नेत्यांनी आमदार काळे यांच्या कामाची प्रशंसा केली असून त्यांनी विशेष बाब म्हणून ही जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार काळे यांनी खा. राहुल गांधी यांच्या वर्धा जिल्हा दौऱ्यादरम्यान मोठी भूमिका बजावली होती. खा. अशोक गहलोत, मल्लिकार्जुन खरगे यांनी हे जवळून पाहिले होते.