अतिसार पंधरवड्यात औषधांचे वाटप
By Admin | Updated: August 3, 2014 23:33 IST2014-08-03T23:33:38+5:302014-08-03T23:33:38+5:30
विजयगोपाल कार्यक्षेत्रात जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात बालमृत्यू टाळण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

अतिसार पंधरवड्यात औषधांचे वाटप
विजयगोपाल : विजयगोपाल कार्यक्षेत्रात जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात बालमृत्यू टाळण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्माचारी घरोघरी जाऊन औषधीचे वाटप करतात.
या कार्यक्रमाला जि.प. सदस्य उज्वला राऊत, पं.स. सदस्या सविता बनकर, सरपंच निलम बिनोड, ग्रा.पं. सदस्य राऊत, डॉ. अनिल डहाके, तुकाराम तेलंगे, ग्रा.पं. सदस्य मेघा धुमाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना या आजाराबाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय दाढे यांनी बालमृत्यू टाळण्याकरिता अतिसार नियंत्रण पंधरवडा हा उपक्रम राबवितात. या उपक्रमात पाच वर्षाखालील होणाऱ्या बालमृत्यूपैकी ११ टक्के मृत्यू हे केवळ अतिसार किंवा डायरिया या आजारामुळे होतात. हे बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता या कार्यक्षेत्रातील १९ आशा स्वयंसेविका दोन टप्प्यात कामे करीत आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात घरोघरी सर्वेक्षण करुन पाच वर्षाखालील बालकांना ओआरएस पाकीटाचे मोफत वाटप व औषधी घेण्याची पद्धती, स्तनपानाबद्दल माहिती व पूरक पोषण आहाराबाबत जनजागृती करण्यात येईल. याकरिता आशा स्वयंसेविकांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कडूकर यांनी केले. आभार जांभुळकर यांनी मानले. कार्यक्रमाला परतेकी, इंगळे, दिघाडे, श्याम, रोशन, माधूरी यासह आशा स्वयंसेविका व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)