३०० लोकांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 10:35 PM2018-07-26T22:35:44+5:302018-07-26T22:36:42+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून आष्टी नगरपंचायत जलशुध्दीकरण केंद्रामधून दुर्गंधीयुक्त पिवळे दुषित पाणी पुरवठा करीत आहे. या विरोधात आष्टीकर संतप्त झाले आहे.

Allocation of 300 people to the Chiefs | ३०० लोकांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव

३०० लोकांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव

Next
ठळक मुद्देदुर्गंधीयुक्त पाण्याच्या विरोधात आष्टीकर एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : गेल्या अनेक दिवसांपासून आष्टी नगरपंचायत जलशुध्दीकरण केंद्रामधून दुर्गंधीयुक्त पिवळे दुषित पाणी पुरवठा करीत आहे. या विरोधात आष्टीकर संतप्त झाले आहे. गुरूवारी ३०० महिला, पुरुष मंडळींनी नगरपंचायतवर मोर्चा काढून मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. प्रकरण चांगलेच तापले आहे. आंदोलक मोर्चेकरांनी शुध्द पाणी न दिल्यास लढा तीव्र करणार असल्याचे सांगितले.
ममदापूर तलावामध्ये अनेक वर्षापासून गाळ उपसला नाही. तेथून जलशुध्दीकरण केंद्रावर येणारे पाणी सडके व दुर्गंधीयुक्त आहे. पावसाळा सुरू होण्याआधी नगरपंचायतीने काहीही उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे दुषित सडके पाणी पिण्यात गेल्याने भयंकर परिस्थिती चिघळली आहे. साथीच्या आजाराची लागण होण्याची लक्षणे आढळून आली आहे. नगरपंचायत करवसूली करतात, मात्र स्वच्छ पाणी पुरवित नाही. यासाठी आष्टीकरांनी बरीच वाट पाहिली, तरीसुध्दा काहीच हालचाल झाली नाही.
याप्रकरणी २५ जुलैला लोकमतमध्ये ‘२५ हजार लोकसंख्येच्या आरोग्याशी खेळ’ दुर्गंधीयुक्त पिवळ्या पाण्याचा पुरवठा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी महिला व पुरुष मंडळी यांनी दुपारी १ वाजता नगरपंचायतमध्ये मोर्चा आणला. मुख्याधिकारी पंकज गोसावी यांना सर्व मोर्चेकरांनी घेराव घातला. एका कॅनमध्ये पिवळे पाणी आणले ते पाणी मुख्याधिकारी यांनी पिवून दाखवावे असे आवाहन केले. सत्ताधारी पदाधिकारीही हजर होते. त्यांनी यावर काहीही उत्तर दिले नाही. प्रकरणाची दखल घेऊन स्वच्छ पाणी देवू, असे मुख्याधिकारी सांगत होते. मात्र सद्यातरी काहीही पर्यायी उपाययोजना केल्या नाही.
आरोग्य विभागाकडून जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी
नगरपंचायतमधील पाण्याचा प्रश्न सद्यातरी चांगलाच पेटला आहे. बुधवारी जलशुद्धीकरण केंद्राची आरोग्य विभागाने पाहणी केली. विरोधी पक्षाने भाजपा सदस्यही पाणी प्रश्नावर संतप्त झाले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करण्याच्या आश्वासनावर सध्या आंदोलक मोर्चेकरी आठवडाभर प्रतीक्षा करणार असल्याचे सांगितले. तात्काळ शुध्द पाणी न दिल्यास जनआंदोलन उभारण्याचा, इशारा मोर्चेकरांनी मुख्याधिकारी यांना दिला आहे.

 

Web Title: Allocation of 300 people to the Chiefs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.