शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

आयटकचा महागाई, खासगीकरण विरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 05:00 IST

पेट्रोलियम पदार्थावरील सर्वप्रकारचे सेस व सरचार्ज मागे घ्या. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गव्हाचे वितरण पूर्वरत करा. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू, विशेषत: डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा झालाच पाहिजे. आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना दरमहा ७ हजार ५०० हस्तांतरित करा. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या तरतुदीत वाढ करा. बेरोजगार भत्ता देण्यासाठी केंद्रीय कायदा करा.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने वाढती महागाई, खासगीकरण व बेरोजगारी यासह योजना कामगारांच्या विविध मागण्यांकरिता मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ठिय्या देऊन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.पेट्रोलियम पदार्थावरील सर्वप्रकारचे सेस व सरचार्ज मागे घ्या. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गव्हाचे वितरण पूर्वरत करा. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू, विशेषत: डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा झालाच पाहिजे. आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना दरमहा ७ हजार ५०० हस्तांतरित करा. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या तरतुदीत वाढ करा. बेरोजगार भत्ता देण्यासाठी केंद्रीय कायदा करा. शहरी भागासाठी रोजगार हमी योजनेचा कायदा करा, सर्व रिक्त जागा त्वरित भरा तसेच केंद्र सरकाने केलेली  कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द करा. देशाला आत्मनिर्भर  बनविणाऱ्या  रेल्वे, विमा, बँक, डिफेन्स कोल, पेट्रोलियम, टेलिफोन, आरोग्य व शिक्षण आदी सार्वजनिक क्षेत्राच्या खासगीकरणाचे धोरण मागे घ्या आणि अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, अंशकालीन स्त्री-परिचर, उमेद वर्धिनी, कंत्राटी आरोग्यसेविका आदी कामगारांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व सामाजिक सुरक्षा लागू करा, यासह आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव मनोहर पचारे, विजया पावडे, संयुक्त कामगार संघटनेचे गुणवंत डकरे, आयटक जिल्हा सचिव वंदना कोळणकर, सुरेश गोसावी, सोनाली पडोळे, द्वारका इमडवार, गजेंद्र सुरकार, मैना उईके, ज्ञानेश्वरी डंबारे, मंगला इंगोले, शबाना शेख, अल्का भानसे, अरुणा गावंडे, वंदना रेवतकर, सुजाता भगत, सुनंदा आखाडे, विनायक नन्नोरे, ज्योस्तना राऊत, प्रतिभा वाघमारे, वीणा पाटील, रेखा तेलतुंबडे, प्रज्ञा नाईक, प्रमिला वानखेडे, निर्मला देवतळे, वैशाली नंदरे, जयमाला बेलगे, रेखा नवले, सिंधू खडसे, मंजू शेंडे, ज्योत्सना मुंजेवार, नंदा महाकाळकर, आम्रपाली बुरबुरे, ज्योती फुलझेले, शबाना खान, रेखा कोठेकर, वच्छला परतेकी, शोभा पाटमासे, जयश्री पाटील, तारा थेटे, सिंधू इंगळेसह अंगणवाडी सेविका व मदतनीसांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :agitationआंदोलनMorchaमोर्चा