वायू प्रदूषणाने डोळ्यांच्या आजारात वाढ
By Admin | Updated: May 20, 2014 23:51 IST2014-05-20T23:51:29+5:302014-05-20T23:51:29+5:30
अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या सृष्टीचे अवलोकन करण्यासाठी आपले डोळे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात; पण मनाच्या स्वार्थी स्वभावामुळे होणार्या पर्यावरण ºहासाचा परिणाम डोळ्यावर होत आहे़

वायू प्रदूषणाने डोळ्यांच्या आजारात वाढ
वर्धा : अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या सृष्टीचे अवलोकन करण्यासाठी आपले डोळे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात; पण मनाच्या स्वार्थी स्वभावामुळे होणार्या पर्यावरण ºहासाचा परिणाम डोळ्यावर होत आहे़ सृष्टीच्या विनाशामुळे ही दृष्टीच संकटात आल्याची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़ आधुनिक जीवनशैली, औद्योगिकरण आदी घटकांमुळे डोळे प्रभावित होत आहेत़ दररोज होणारे वायूप्रदूषण, अनेक विषारी वायू डोळ्यांच्या दृष्टीपटलास इजा पोहोचविण्यास कारणीभूत ठरत आहे. घराबाहेर निघताच डोळ्यांचा प्रत्यक्ष संबंध कॉर्बनडाय आॅक्साईड, बॅक्टेरिया, धुळीचे कण आदींशी येतो़ यामुळे डोळ्यांबाबतचे अनेक आजार समोर येत आहेत़ डोळ्यांच्या संरक्षणाच्या दृ्ष्टीने पर्यायी साधनांचा वापर न केल्यास विषारी वायूचा थेट परिणाम डोळ्यावर होतो. औद्योगिक प्रदूषणासोबतच हॉटेल, भट्टी, जाळण्यात आलेला कचरा, प्लास्टिक आदींसह वाहनातून निघणारा धूर डोळ्यांवर परिणाम करीत आहे. वाहनांच्या वर्दळीच्या ठिकाणी याचे प्रमाणे अधिक दिसून येते. गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्बनडाय आॅक्साईडचे उर्त्सजन होते. यामुळे त्याचा प्रभाव डोळ्यांवर होत आहे़ शरिराचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असलेल्या डोळ्यांवर होणार्या विविध वायूच्या मार्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे़ सध्या वातावरणात कॉर्बन मोनोक्साईड २ टक्के प्रमाणे वाढले आहे़ हे डोळ्यासाठी अत्यंत हानीकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ याकडे लक्ष देत उपायायोजना करणे गरजेचे आहे़(स्थानिक प्रतिनिधी)