बी.वाय.अँग्रो. इन्फ्रा. कंपनीला २३.५१ लाखांचा दंड

By Admin | Updated: May 29, 2014 02:41 IST2014-05-29T02:41:44+5:302014-05-29T02:41:44+5:30

कारंजा तहसीलच्या सिंदीविहिरी स्थित बी.वाय.अँग्रो. इन्फ्रा कंपनीला रस्ता तयार ..

B.Y. Agro Infra 23.51 lakh penalty for the company | बी.वाय.अँग्रो. इन्फ्रा. कंपनीला २३.५१ लाखांचा दंड

बी.वाय.अँग्रो. इन्फ्रा. कंपनीला २३.५१ लाखांचा दंड

आकोली : कारंजा तहसीलच्या सिंदीविहिरी स्थित बी.वाय.अँग्रो. इन्फ्रा कंपनीला रस्ता तयार करण्याकरिता शेतकर्‍याच्या शेतातील मुरुमाची चोरी करणे भोवले. कारंजा तहसीलदाराने एका आदेशान्वये २३ लाख ५१ हजार २५0 रुपयांचा दंड सरकारी खजान्यात जमा करण्याचा आदेश पारित केला आहे. याबाबतचे वृत्त लोकमत

ने प्रकाशित केले होते. वृत्ताची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, मौजा सिंदीविहिरी येथे धनराज नामदेव चोपडे इतरांचे नावे संयुक्त शेती सर्व्हे नं. २६0 आराजी २.0३ हे आर. सर्व्हे न. २५६ आराजी ४.0६ हे आर शेतामधील गैरअर्जदार बी.वाय.अँग्रो. इन्फ्रा. कंपनीचे संचालक हसन खुमेजा शफी यांनी रोडच्या कामाकरिता अवैध उत्खनन केले होते. त्यासंबंधीचे प्रकरण कारंजा तहसिलदारापुढे सुरु होते. अवैध गौण खनिज उत्खननाबाबत मोजमाप व अहवाल तयार करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारंजा(घा.) यांना पत्र देवून माहिती मागविण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार स.न. २५६ मधून ६५९८.0१५ घन मिटरचे उत्खनन केले. तसेच सर्व्हे नं. २६0 मधून ४५२.५९ घटमिटरचे उत्खनन केले, तर सर्व्हे क्र. २५७ मधील तलावात पाणी असल्यामुळे तलावातून जे उत्खनन करण्यात आले त्याबाबतचे मोजमाप होणे बाकी आहे. याप्रकरणी तहसिलदारांनी अर्जदार व गैरअर्जदारांचे बयान नोंदविले. गैरअर्जदाराने केलेल्या उत्खननाची परवानगी देण्यात आली नव्हती, हे उघड झाले. कंपनीच्या संचालकांनी ७00३.६0५ घनमिटर अवैध उत्खनन करुन रोडचे बांधकाम केले. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) नुसार बि.वाय.अँग्रो इन्फ्रा र्मया. या कंपनीचे संचालक हसन खुजेमा शफी (नागपूर) यांच्यावर २३, ५१, २५0 रुपयांचा दंड आकारण्यात आला. अधिकार शुल्क (रॉयल्टी) आकारण्याचे आदेश तहसीलदार तथा कोर्ट विद्यमान जी. सी. बर्वे यांनी दिला आहे.(वार्ताहर)

Web Title: B.Y. Agro Infra 23.51 lakh penalty for the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.