कृषी अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर

By Admin | Updated: August 16, 2014 23:38 IST2014-08-16T23:38:58+5:302014-08-16T23:38:58+5:30

कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या २००४ पासून प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ पुणे यांच्यावतीने ११ आॅगस्टपासून धरणे आंदोलन सुरू केले़ मागण्या मान्य न झाल्यास

Agricultural Officer, Employee Strikes | कृषी अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर

कृषी अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर

मागण्या प्रलंबित : शेतकऱ्यांची होणार पंचाईत
वर्धा : कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या २००४ पासून प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ पुणे यांच्यावतीने ११ आॅगस्टपासून धरणे आंदोलन सुरू केले़ मागण्या मान्य न झाल्यास स्वातंत्र्य दिनापासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता़ अनेकदा आंदोलने करूनही शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने कृषी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.
कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये विभागातील तांत्रिक सर्वंगातील वेतनश्रेणी व दर्जा वाढीबाबत मंत्रीमंडळाने १६ जुलै २००४ रोजी घेतलेल्या निर्णयाची अमंलबजावणी करावी़ कृषी विभागाच्या काही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्यात यावा़ कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे़ शून्य आधारीत अर्थसंकल्पात कमी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी नियमीत करावा़ कृषी पर्यवेक्षक संवर्गातील सर्व पदे कृषी सहायकातून पदोन्नतीने भरावीत़ कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांच्या प्रवास भत्तात वाढ करण्यात यावी. कृषी सेवकांची तीन वर्षांची सेवा अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात यावी़ आत्मा योजनेत प्रतीनियुक्तीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती भत्ता देण्यात यावा़ साप्ताहिक पेरणी अहवाल कृषी विभागाकडून काढून तो महसूल विभागाकडे देण्यात यावा़ कृषी सहायक संवर्गाचे पदनाम सहायक कृषी अधिकारी, असे करण्यात यावे आणि सर्व संवर्गातील रिक्त पदे पदोन्नती व सरळसेवेने त्वरित भरण्यात यावीत आदी मागण्यांचा समावेश आहे.
धरणे आंदोलनामध्ये तालुका कृषी अधिकारी संजय साखरे, संजय हाडके, कृषी पर्यवेक्षक सुनील जावळेकर, दिलीप धोटे, अरुण चहांदे, ठोंबरे, भोमराज हुलके, रमेश तामगाडगे, सुनील गावंडे, वैद्य, कृषी सहायक संवर्गातून वागदे, गुजरकर, बारापात्रे, काळमेघ, डोंगरे, रामटेके, चंदनखेडे, खटी, कुबडे, धुमाळे, पराते, दुर्गे, वाढई, मडावी, झोडापे, डोर्लीकर, निखाडे, वाठोरे, ठाकरे, शिरसाट, कुंठावार यांच्यासह अन्य तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कृषी विभागातील बेमुदत संपामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Agricultural Officer, Employee Strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.