शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

वर्ध्यात राज्य परिहवन मंडळाच्या विभाग नियंत्रकांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 3:42 PM

राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत शिकाऊ उमेदवार म्हणून असलेल्या तरुण-तरुणांना मिळणाऱ्या मानधनातून प्रोफेशन टॅक्सच्या नावाखाली १७५ रुपयांची कपात केली जात आहे.

ठळक मुद्देयुवा परिवर्तनचे आंदोलनप्रोफेशनल टॅक्स कपातीचा केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत शिकाऊ उमेदवार म्हणून असलेल्या तरुण-तरुणांना मिळणाऱ्या मानधनातून प्रोफेशन टॅक्सच्या नावाखाली १७५ रुपयांची कपात केली जात आहे. हा प्रकार आमच्यावरील अन्याय असल्याचा आरोप करीत शनिवारी सदर तरुण-तरुणींनी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात रापमच्या विभाग नियंत्रकांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. यावेळी झालेल्या चर्चेनंतर आंदोलनकर्त्यांनीआंदोलन मागे घेतले.रापमच्या वर्धा विभागाच्या अधिकारात येणाऱ्या कार्यशाळेत सुमारे ६१ तरुण-तरुणी शिकाऊ उमेदवार म्हणून विविध विषयांचे प्रशिक्षण घेत आहेत. इतकेच नव्हे तर या तरुणांना सरकारच्यावतीने सुमारे ७ हजार ७६३ रुपये मानधन दिले जाते. परंतु, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या मानधनातून रापमच्या वर्धा विभागाच्यावतीने प्रोफेशनल टॅक्सचे कारण पुढे करीत चक्क १७५ रुपयांची कपात करण्यात आली. हा प्रकार काही तरुणांच्या निदर्शनास येताच त्यांनी रापमच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. परंतु, त्यांच्याकडून उडवा-उडवीचे उत्तरे देत थेट सीआर खराब करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर सदर तरुण-तरुणींनी आपली समस्या युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्याकडे मांडली. त्यावर निहाल पांडे यांच्या नेतृत्त्वात सदर शिकाऊ उमेदवारांनी शनिवारी रापमच्या वर्धा विभाग नियंत्रक कार्यालय गाठले. शिवाय विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांच्या दालनात ठिय्या देत आपली समस्या मांडली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.कपात करणारा वर्धा विभाग एकमेवशिकाऊ उमेदवारांना देण्यात येणाऱ्या मानधनातून प्रोफेशनल टॅक्सच्या नावाखाली कपात केवळ वर्धा विभागातच करण्यात आली आहे. चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, भंडारा या विभागात कुठल्याही प्रकारची कपात करण्यात येत नसून हा आमच्यावरील अन्याय असल्याचा आरोप करीत सदर कपात तात्काळ मागे घेऊन कपात केलेली रक्कम परत करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेटून लावली होती.महिला अधिकाऱ्याकडून सीआर खराब करण्याची धमकीविद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनातून करण्यात आलेल्या कपातीबाबत सदर काही शिकाऊ तरुण-तरुणींनी रापमच्या डीपीओ करिष्मा शर्मा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडे त्याबाबतची लेखी नियमावली आहे. तुम्ही जास्त दबाब आणल्यास किंवा कुठलेही आंदोलन केल्यास तुमचा सीआर खराब करू अशी धमकी दिल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे याची चौकशी करून सदर महिला अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणीही याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी केली.परीक्षेपासून वंचित राहण्याची भीतीज्यांची नियुक्ती ज्या महिन्यात झाली त्या महिन्याचा आधार घेत परीक्षा घेतली जाईल असे रापमच्या अधिकाऱ्यांच्यावतीने तोंडी सांगितले जात आहे. त्यामुळे एकूण विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी रापमच्या विभाग नियंत्रकांनी योग्य पाऊल उचलावेत असेही यावेळी सदर शिकाऊ उमेदवारांनी सांगितले.मानधनातून होणाऱ्या कपातीची माहिती आपल्याला आजच मिळाली. त्या अनुषंगाने आपण संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून विचारणा केली असता आम्हाला आमची चूक लक्षात आली आहे. त्यामुळे यापूढे ही कपात होणार नाही. शिवाय कपात झालेली रक्कम येत्या दहा दिवसात सदर शिकाऊ उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करू. इतकेच नव्हे तर कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहो. तर ज्या महिला अधिकाऱ्याने सीआर खराब करण्याची धमकी दिली त्याची चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात येईल. तसेच चौकशी करून सदर प्रकारातील जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.- चेतन हसबनीस, विभाग नियंत्रक, रा.प.म. वर्धा.

टॅग्स :agitationआंदोलन