शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

तीन वर्षे लोटूनही रोहित्र दुरुस्त होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:33 PM

शिवणफळ गावातील दोन रोहित्र मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने पाणीपुरवठा योजनेला फटका बसला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गावठाणाच्या रोहित्रावरून वीस कृषी पंप आणि नळयोजना सध्या कार्यान्वित असून एकाच रोहित्रावर अधिक विद्युत दाब येत असल्याने निम्मे गाव काळोखात राहते.

ठळक मुद्देएकाच रोहित्रावर भार : निम्मे गाव अंधारात, शिवणफळचे ग्रामस्थ हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : शिवणफळ गावातील दोन रोहित्र मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने पाणीपुरवठा योजनेला फटका बसला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गावठाणाच्या रोहित्रावरून वीस कृषी पंप आणि नळयोजना सध्या कार्यान्वित असून एकाच रोहित्रावर अधिक विद्युत दाब येत असल्याने निम्मे गाव काळोखात राहते. संबधित विभागाकडे वारंवार रोहित्र दुरुस्तीची मागणी केल्यावरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.तीन वर्षांपूर्वी गावठाणावरील विद्युत दाब कमी करण्यासाठी दोन रोहित्र बसविण्यात आले. मात्र, रोहित्र सुरू करण्याचा संबंधितांना विसर पडला. रोहित्र सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हे दोन्ही रोहित्र नादुरुस्त असल्याने अद्याप बंद आहेत. सध्या शिवणफळ गावातील गावठाणावरील एकाच रोहित्रावरून पाणी पुरवठा योजनेच्या जोडणीसह २० कृषिपंपाला जोडणी देण्यात आली आहे. यामुळे विद्युत रोहित्रावर अधिक दाब येत असल्याने ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे. परिणामी पीठ गिरण्या बंद राहतात. याचा फटका नागरिकांना बसत आहे.महिलांना चार ते सहा किलोमीटर अंतरावरील गावातून दळण दळून आणावे लागत आहे. वीज वितरण कंपनीकडे रोहित्र बदलविण्यासाठी गावकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले आहे.या गावातील शेतशिवारातील कृषिपंपाची जोडणी स्वतंत्र करण्याच्या हेतूने दोन ठिकाणी रोहित्र उभारण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने रोहित्र उभारणीचे काम पूर्ण केले. मात्र या रोहित्राला विद्युत पुरवठा केलाच नाही. त्यामुळे नादुरुस्त अवस्थेत दोन्ही ठिकाणचे रोहित्र निकामी पडलेले आहे. तीन वर्षे लोटूनही या समस्येकडे विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. तातडीने दोन्ही रोहित्र दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.विद्युतवाहिनी गेली चोरीलाशिवणफळ गावातील बसस्थानक लगतच्या झोपडपट्टी भागातील प्रवाहित तारा चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र अद्यापही कंपनीच्या अधिकाºयांना याविषयी कुठलीही माहिती नाही, हे नवलच. यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाºयांचा निष्काळजीपणा उजेडात आला आहे. याविषयी नागरिकांत रोष व्यक्त करण्यात येत आहे.पाणीपुरवठा योजनेला फटकाशिवणफळ गावठाण रोहित्रावरून गावाला आणि नळयोजनेला विद्युत पुरवठा होत आहे. मात्र, याच रोहित्रावरून २० कृषिपंप आणि दोन पीठगिरण्या चालत असल्याने रोहित्रावर अधिक विद्युत दाब येतो. यामुळे वारंवार रोहित्रात बिघाड येतो. यामुळे निम्मे गाव अंधारात असते. या प्रकारामुळे गावात वीजपुरवठ्याचा नित्याने लपंडाव सुरू असतो. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहे.

टॅग्स :electricityवीज