लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : यवतमाळकडून देवळीकडे येणाऱ्या कारचा देवळी येथील यशोदा नदीजवळ अपघात झाला. यात कारचालक राहुल पोहरे याचा जागीच मृत्यू झाला. तर स्मिता राहुल पोहरे, आरती रवी पोहरे, अधिक रवी पोहरे, अशमिका पोहरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादराम्यान आठ वर्षीय अशमिका हिचा मृत्यू झाला आहे.यवतमाळ शहरातील प्रजापतीनगर येथील पोहरे कुटुंब देवळी शहराकडे येत असताना वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना भरधाव कार देवळी-यवतमाळ मार्गावरील यशोदा नदीजवळील रस्ता दुभाजकावर चढली. यात राहुल यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील जखमींना सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान अशमिका हिची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद देवळी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास तिरुपती राणे करीत आहेत.
राहुलनंतर अशमिकावर काळाची झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST
यवतमाळ शहरातील प्रजापतीनगर येथील पोहरे कुटुंब देवळी शहराकडे येत असताना वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना भरधाव कार देवळी-यवतमाळ मार्गावरील यशोदा नदीजवळील रस्ता दुभाजकावर चढली. यात राहुल यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील जखमींना सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान अशमिका हिची प्राणज्योत मालवली.
राहुलनंतर अशमिकावर काळाची झडप
ठळक मुद्देदेवळी येथील अपघात : सावंगीच्या रुग्णालयात सुरू होता उपचार