निराधारांसाठी धनोडीत मायेची शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:01 IST2018-01-25T00:01:19+5:302018-01-25T00:01:38+5:30

धनोडी (बहाद्दरपूर) येथील समर्पण सेवाभावी संस्थेने गावातील ११ निराधार मंडळींचा शोध घेऊन त्यांच्यासाठी १५ जानेवारीपासून मंदार अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून मायेची शिदोरी हा उपक्रम सुरू केला आहे.

The affirmation of the greed | निराधारांसाठी धनोडीत मायेची शिदोरी

निराधारांसाठी धनोडीत मायेची शिदोरी

ठळक मुद्दे११ वृद्धांना रोज मिळणार नि:शुल्क जेवण : समर्पण सेवाभावी संस्थेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : धनोडी (बहाद्दरपूर) येथील समर्पण सेवाभावी संस्थेने गावातील ११ निराधार मंडळींचा शोध घेऊन त्यांच्यासाठी १५ जानेवारीपासून मंदार अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून मायेची शिदोरी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरूवात ज्येष्ठ नागरिक प्रभू जयस्वाल, डॉ. बोडखे, जिजा कावळे, मालती जानूस्कर, प्रभा नाखले, सुशीला काळे, दीपा काळे, रेखा राऊत, विलास धवल, विलास कडू, रितेश वानखेडे, व संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वृद्धांना डबा देऊन करण्यात आली.
सदर उपक्रमाच्या माध्यमातून दररोज दोन्ही वेळेला ११ वृद्धांना मोफत जेवणाचा डबा दिला जाणार आहे. सदर जबाबदारी गावातील रितेश वानखेडे व त्यांच्या पत्नी यांनी स्वीकारली आहे. या उपक्रमासाठी अशोक गिरी, कर्नल दीपक खडसे, समीर दांबले, मोरेश्वर दांबले, मंदार अभ्यंकर, किशोर कोल्हे यांनी आर्थिक सहकार्य केले आहे.
समर्पण संस्थेच्या माध्यमातून यापूर्वीही सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम राबविण्यात आले. वृक्षरोपण करून वृक्ष जगविण्यासाठी झाडांच्या सभोवतला ठिंबक सिंचन संच लावण्यात आले. युवकांसाठी व्यायाम शाळा स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी मोफत माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे.
अनेक गावे उपक्रमासाठी सरसावली
नागरिकरणामुळे रोजगाराच्या शोधात अनेक युवक गावातून शहराकडे स्थानांतरीत झाले आहे. हे होत असताना अशा कुटुंबातील आई-वडील गावातच राहिले आहे. त्यामुळे गावात आता वृद्ध मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वार्धक्यामुळे अशा वृद्धांना रोजच्या जेवणाची व्यवस्थाही स्वत: करता येत नाही. असे उपक्रम अनेक खेड्यात सुरू झाले आहेत.

Web Title: The affirmation of the greed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.