शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील एक गाव घेणार दत्तक

By admin | Updated: June 8, 2014 00:05 IST

सेंद्रिय शेतीकडे शेतकर्‍यांचा कल वाढविण्यासाठी केंद्र शासनाने ‘सेंद्रीय शेती गाव दत्तक योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंबलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

शासनाची सेंद्रीय शेती गाव दत्तक योजनासचिन देवतळे - विरूळ (आ.)सेंद्रिय शेतीकडे शेतकर्‍यांचा कल वाढविण्यासाठी केंद्र शासनाने ‘सेंद्रीय शेती गाव दत्तक योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंबलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाला देण्यात येणार आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. याचे मानवी आरोग्यावर दुष्परिणामही हळूहळू जाणवू लागले आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर जमिनीची सुपिकता कमी होऊन त्याचा थेट उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडेच राष्ट्रीय मृदसंधारण सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात विदर्भातील ४७ टक्के जमिनीचे आरोग्य बिघडले असल्याची बाब समोर आली.  शेतकर्‍यांची सेंद्रीय शेतीची समस्या दूर व्हावी, याकरिता घन कचर्‍यापासून खत तयार केले जाणार आहे. सेंद्रीय शेतीमधील उत्पादित शेतमालाला बाजारपेठ मिळावी यासाठी देशभर व्यापक स्वरुपात धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी ३0 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. सेंद्रीय शेतीबाबत शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्याकरिता व्यापक स्वरुपात प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून मातीचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. ही योजना केंद्र शासन, नाबार्ड, राज्य सरकार यांच्या समन्वयातून राबविली जाणार आहे. याचा १२ व्या पंचवार्षिक योजनेत समावेश करण्यात आला आहे. या संबंधीच्या मार्गदर्शक सूचनाही संबंधित विभागाला प्राप्त झाल्या असल्याची माहिती आहे.