प्रशासनाची चांदी; तेरा महिन्यांत कमविला 67.07 कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:00 IST2022-05-12T05:00:00+5:302022-05-12T05:00:11+5:30
वाळू, मुरुम, गिट्टी, माती गौण खनिजांत मोडत असून रॉयल्टी तसेच वाळू घाटांच्या लिलावांच्या माध्यमातून मागील तेरा महिन्यांत वर्धा जिल्हा प्रशासनाला तब्बल ४५ कोटी ९१ लाख ११ हजारांचा महसूल प्राप्त झाला होत. तर पूर्वी करमणूक कराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळायचा. पण मागील तेरा महिन्यांत करमणूक शुल्काच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला केवळ दोन लाख एक हजारांचा महसूल मिळाल्याचे वास्तव आहे.

प्रशासनाची चांदी; तेरा महिन्यांत कमविला 67.07 कोटींचा महसूल
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा प्रशासनाला विविध माध्यमातून महसूल मिळत असून मागील तेरा महिन्यांच्या काळात तब्बल ६७.०७ कोटींचा महसूल जिल्हा प्रशासनाने गोळा केला आहे. यात सर्वाधिक महसूल गौण खनिजाच्या माध्यमातून प्राप्त झाला असून करमणूक कराच्या माध्यमातून केवळ २.०१ लाखांचाच महसूल मिळाल्याने करमणूक विभागाचे काम पूर्वीच्या तुलनेत चांगलेच ढेपाळल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
वाळू, मुरुम, गिट्टी, माती गौण खनिजांत मोडत असून रॉयल्टी तसेच वाळू घाटांच्या लिलावांच्या माध्यमातून मागील तेरा महिन्यांत वर्धा जिल्हा प्रशासनाला तब्बल ४५ कोटी ९१ लाख ११ हजारांचा महसूल प्राप्त झाला होत. तर पूर्वी करमणूक कराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळायचा. पण मागील तेरा महिन्यांत करमणूक शुल्काच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला केवळ दोन लाख एक हजारांचा महसूल मिळाल्याचे वास्तव आहे. तर जमीन महसूलच्या माध्यमातून मागील तेरा महिन्यांत जिल्हा प्रशासनाला २१ कोटी १४ लाख ७९ हजारांचा महसूल प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच मागील तेरा महिन्यांत जमीन महसूल व करमणूक शुल्क तसेच गौण खनिजच्या माध्यमातून तब्बल ६७.०७ कोटींचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळाल्याने जिल्हा प्रशासनाची चांदीच झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
उद्दिष्ट १०७.२५ कोटी; पण प्रत्यक्ष काम ५९%
- १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षात जमीन महसूल, करमणूक शुल्क तसेच गौण खनिजाच्या माध्यमातून एकूण १०७ कोटी २५ लाख ६२ हजारांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते.
- पण यंदा मार्च अखेरपर्यंत ५९.४० टक्के म्हणजे ६३ कोटी ७१ लाख ३९ हजारांचा महसूल गोळा करण्यात वर्धा जिल्हा प्रशासन यशस्वी झाल्याचे वास्तव आहे.