शेतकऱ्याच्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 22:03 IST2019-04-18T22:02:49+5:302019-04-18T22:03:40+5:30

बोर कालव्याची गत काही वर्षांपासून डागडुजी व दुरुस्ती केली नाही. सध्या कालव्याचे खोलीकरण सुरू आहे. अशातच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पाझरणाऱ्या कालव्याचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.

The administration ignores the complaints of farmers | शेतकऱ्याच्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

शेतकऱ्याच्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

ठळक मुद्देदरवर्षी पाझरते कालव्याचे पाणी : बांधकाम करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : बोर कालव्याची गत काही वर्षांपासून डागडुजी व दुरुस्ती केली नाही. सध्या कालव्याचे खोलीकरण सुरू आहे. अशातच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पाझरणाऱ्या कालव्याचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.
घोराड येथील शेतकरी गुणवंत कवडू राऊत यांनी २०१४ मध्ये कालव्याचे पाणी शेतात पाझरल्याने पिकाचे नुकसान झाल्याच्या तक्रारी संबंधित विभागाकडे केल्या; मात्र दखल घेण्यात आली नाही. कोटंबा वितरिकेच्या पाझरणाऱ्या  केवळ फक्त ४० मीटरचे बांधकाम केले जाणार आहे पण, ४० मीटर बांधकामाने ही समस्या सुटणार काय? हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
या शेतकºयाच्या शेताजवळील वितरिकेचे खोलीकरण करताना शेताला असणारे तारेचे कुंपण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. शेतकऱ्याने मनाई केली असता कर्तव्यावर असणाऱ्या रोजंदारी कर्मचाºयाने शेतकऱ्याला पाहून घेण्याची भाषा केली. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी घोराड वितरिकेवर घडला.
त्यावेळी संबंधित अभियंत्याने माफी मागून बाजू सावरण्याचा प्रकार घडला. या रोजंदारी कामगाराने शेतकºयाला शिवीगाळ करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यानंतर शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून ज्वारी व संत्रा पिकाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी अर्जाद्वारे केली आहे.
शेतकºयाने तहसीलदार, पाटबंधारे विभाग , पोलीस ठाण्यात ही तक्रार केली असून यावर कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. बांधकामानंतर शेतात पाणी पाझरल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकणार आहे.

बोर वितरिकेचे खोलीकरण सुरू असताना संबधित विभागाचे अभियंता हजार न राहता रोजंदारी कर्मचाºयांच्या भारोष्यावर आपला गाडा हकालत असल्याचे दिसून येत आहे कोणतेही काम करीत असताना शेतक?्याला विश्वासात घेणे गरजेचे नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: The administration ignores the complaints of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.