विद्युत देयकासाठी अडले हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST2019-09-05T06:00:00+5:302019-09-05T06:00:21+5:30

किरायाच्या इमारतीतून चालणाऱ्या दवाखान्यातून ही सेवा देण्यात अडसर ठरत असल्याने गत तीन वर्ष अगोदर प्रशस्त अशी इमारत बांधण्यात आली पण सार्वजनिक बांधकाम विभागाने संबधित विभागाला हस्तांतरण केली नाही.

Ad transfer for electricity payments | विद्युत देयकासाठी अडले हस्तांतरण

विद्युत देयकासाठी अडले हस्तांतरण

ठळक मुद्देपशुवैद्यकीय दवाखान्याच्या उद्घाटनाला मुहूर्ताची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : गत दोन वर्षांपासून लोकार्पण च्या प्रतीक्षेत असलेली पशुवैद्यकीय दवाखानाच्या इमारतीचा प्रवेशाचा मुहूर्त विद्युत देयकामुळे अडल्याची माहिती पुढे आली आहे. आता वीज देयक भरल्यानंतर या इमारतीचा प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
लाखो रुपये खर्च करून घोराड गावात ग्राम पंचायतीच्या ओपन स्पेस वर प्रशस्त अशी इमारत बांधण्यात आली. घोराड व परिसरातील जनावरांच्या आरोग्याची नीट काळजी घेता यावी म्हणून राज्यस्तरीय द्वितीय श्रेणीचा पशुवैद्यकीय दवाखाना येथे आहे. किरायाच्या इमारतीतून चालणाऱ्या दवाखान्यातून ही सेवा देण्यात अडसर ठरत असल्याने गत तीन वर्ष अगोदर प्रशस्त अशी इमारत बांधण्यात आली पण सार्वजनिक बांधकाम विभागाने संबधित विभागाला हस्तांतरण केली नाही. या साठी केलेल्या पाठपुराव्यानंतर आता हस्तांतरण करण्या अगोदर सध्या असलेले वीज देयक भरण्यात यावे असे पत्र पशुवैद्यकीय विभागाने संबधित विभागाला दिले आहे आता हा मार्ग मोकळा होण्यास किती कालावधी लागतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दवाखान्याचा परिसरात वाढलेली झाडे झुडपे जणू बगीचा फुलल्याचे दिसून येत आहे इमारतीचे बांधकाम झाल्यावर हस्तांतरणासाठी वषार्नुवर्ष लागावे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. निवडणुकीची आचासंहिता लागण्यापूर्वी लोकार्पण च मुहूर्त निघेल काय असा प्रश्न घोराड वासीयांनी केला आहे.
बांधकाम विभागाचे वेळ काढू धोरण
गत दोन वर्ष धूळखात राहिलेल्या या इमारतीला पुन्हा एकदा रंग रांगोटी करण्याची वेळ आली असून परिसराच्या साफ सफाईचा खर्च वाढणार आहे खिडक्या व दरवाज्याची दुरस्ती हस्तांतरण करते वेळी करावी लागणार आहे बांधकाम विभागाच्या वेळ काढू धोरणामुळे गो पालकांना मात्र त्रास सहन करावा लागला तर १० बाय १० च्या किरायाच्या खोलीतून पशु वैद्यकीय दवाखान्याचा गाडा अधिकाऱ्यांना हकलावा लागला हे विशेष.

Web Title: Ad transfer for electricity payments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज