अभिनेत्री तनुश्री दत्तावर वर्धा जिल्ह्यातील सेलूमध्ये गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 15:37 IST2018-10-05T15:37:02+5:302018-10-05T15:37:24+5:30

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्यावर वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Actress Tanushree Dutta filed a complaint in Seloo in Wardha district | अभिनेत्री तनुश्री दत्तावर वर्धा जिल्ह्यातील सेलूमध्ये गुन्हा दाखल

अभिनेत्री तनुश्री दत्तावर वर्धा जिल्ह्यातील सेलूमध्ये गुन्हा दाखल

ठळक मुद्देमनसेचा उल्लेख गुंडांची पार्टी असा केला होता

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्यावर वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनुश्री दत्ता हिने मुंबई येथे २७ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसे पक्षाचा उल्लेख गुंडांची पार्टी असा केल्याने मनसेचे सेलू तालुका अध्यक्ष प्रशांत झाडे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तनुश्रीने या पत्रपरिषदेत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान केल्याचे झाडे यांनी नमूद केले आहे. सध्या तनुश्री नाना पाटेकरवर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. सेलूचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. यावेळी मनसेचे वर्धा शहरातील व सेलूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Actress Tanushree Dutta filed a complaint in Seloo in Wardha district