तपासणी पथकाची नियुक्ती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी टंचाई असल्यामुळे सर्वत्र पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. अशातच आपल्याला जास्त पाणी मिळावे म्हणून काही नागरिकांनी नळालाच विद्युतपंप लावले आहे. त्यामुळे इतरांच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनी विद्युत पंप काढावे, अन्यथा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून नळजोडणी खंडित केली जाईल, अशा सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने देण्यात आल्या आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाच्या पिपरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व आर्वी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा केल्या जातो. जलाशयाने तळ गाठल्याने काही दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा केल्यानंतर नळ सुरु असताना काही नागरिक नळाचे मीटर काढून विद्युतपंपाद्वारे पाणी घेतात. यामुळे इतर नळधारकांना व्यवस्थित पाणी मिळत नाही. याबाबत नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे तक्रार केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने यावर नियंत्रण ठेवण्याकरिता कर्मचारी नियुक्त केले आहे. नळग्राहकांनी तत्काळ नळाला लावलेले विद्युतपंप काढावे अन्यथा तपासणी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यास विद्युतपंप जप्त करण्यासोबतच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच कोणतेही कारण न देता नळ जोडणी खंडित करण्यात येईल. सोबतच नळधारकांनी पाण्याचे थकीत असलेले देयक त्वरीत भरावे अन्यथा थकबाकी असणाºयांची नळजोडणी बंद करण्यात येईल, असेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सांगण्यात आले आहे.
नळाला विद्युतपंप लावणाऱ्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:00 IST
पाणी टंचाई असल्यामुळे सर्वत्र पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. अशातच आपल्याला जास्त पाणी मिळावे म्हणून काही नागरिकांनी नळालाच विद्युतपंप लावले आहे. त्यामुळे इतरांच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनी विद्युत पंप काढावे, अन्यथा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून नळजोडणी खंडित केली जाईल,
नळाला विद्युतपंप लावणाऱ्यांवर होणार कारवाई
ठळक मुद्देनळाला विद्युतपंप लावणाऱ्यांवर होणार कारवाई