बांधकाम साहित्याची नासधूस करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
By Admin | Updated: July 23, 2014 00:09 IST2014-07-23T00:09:04+5:302014-07-23T00:09:04+5:30
समुद्रपूर तालुक्यातील जांब येथील शांता पाटील यांच्या घरासमोरील नालीचे बांधकाम सहा महिन्यापासून रखडले होते. घराचे काम सुरू असतानाच ग्रा. पं. च्या वतीने नालीचे बांधकाम सुरू करून संबंधिताच्या

बांधकाम साहित्याची नासधूस करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील जांब येथील शांता पाटील यांच्या घरासमोरील नालीचे बांधकाम सहा महिन्यापासून रखडले होते. घराचे काम सुरू असतानाच ग्रा. पं. च्या वतीने नालीचे बांधकाम सुरू करून संबंधिताच्या घराच्या बांधकाम साहित्याची नासधूस करण्यात आली. यात त्यांचे बरेच नुकसान झाले. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शांता पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील रहिवासी शांता पाटील यांच्या घराजवळून दोन वर्षाअगोदर नालीच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली. पण ते काम अपूर्ण असल्यामुळे अर्धवट खोदकाम तसेच पडून आहे.
काहीच दिवसांपूर्वी शांता पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू केले. त्यामुळे घरासमोर रेती, गिट्टी विटा आदी बांधकाम साहित्य ठेवले होते. त्यातच १५ जुलै रोजी जाम ग्रामपंचायतने कुठलीही पूर्वसूचना न देता तसेच दोन्ही बाजंूनी नाली न खोदता यांच्या घराजवळून जेसीपी लावून बांधकाम साहित्याची नासधूस केली.
दुसऱ्या बाजुने नाली खोदण्यासाठी जागा असतानाही आपल्या वैयक्तिक आकसापोटी घराजवळून नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले व त्यासाठी त्यांच्या घरासमोर ठेवून असलेल्या बांधकाम साहित्याची नासधूस केल्याचा आरोप पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यात त्यांचे जवळपास ४०,००० हजारांचे नुकसान झाले.
या नाली बांधकामामुळे पाटील यांच्या जिन्याला भेग पडली. तसेच आटोसुद्धा तुटला. तसेच सरपंच रिना जांगळेकर यांनी पाटील यांच्या मुलाशी येऊन भांडण केल्याची आटोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे जाम ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी शांता श्यामराव पाटील यांनी गटविकास अधिकारी पं.स. वर्धा आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
(शहर प्रतिनिधी)