वनविभागाची अवैध आरामशीनवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:14 IST2017-11-13T23:13:46+5:302017-11-13T23:14:03+5:30
बजाज चौकातील उड्डाण पुलाखाली सुरू असलेल्या अवैध आरामशीनवर वनविभागाच्या अधिकाºयांनी धाड घातली.

वनविभागाची अवैध आरामशीनवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बजाज चौकातील उड्डाण पुलाखाली सुरू असलेल्या अवैध आरामशीनवर वनविभागाच्या अधिकाºयांनी धाड घातली. या व्यावसायीकाकडे लाकूड कटाईचा कुठलाही परवाना नसल्याने मशीन जप्त करून मशीन मालक भरतकुमार मनसुखलाल पटेलीया याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
या कारवाईत आरामशीनवर असलेले लाकूड चोरीचे असल्याचे या कारवाईत समोर आले. यावेळी भरतकुमार पटेलीया याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे १० हजार रुपयांचे लाकूड व मशीन तसेच इतर साहित्य असा एकूण २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहायक वनसंरक्षक एस. जी. बढेकर, वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. बन्सोड, यु. व्ही. सिरकुडकर, आर. व्ही. राऊत, बी.डब्ल्यु इंगळे, ए.के. कांडलकर, शेख व पोलीस कर्मचारी सुनील चोपडे, विशाल देवतळे यांनी केली. वृत्त लिहीस्तोवर जप्तीची कारवाई सुरू होती.
कटाई करून लाकडाची फर्निचरसाठी विक्री
वनविभागाच्या अधिकाºयांनी केलेल्या कारवाईत भरतकुमार पटेलिया याच्याकडून मोठ्या प्रमाणात लाकूड जप्त केले. भरतकुमार पटेलिया याच्याकडे पूर्वी आरामशीनचा परवाना होता. परंतु, तो त्याने काही वर्षांपूर्वी वर्धेतीलच एका व्यावसायिकाला विकल्याची माहिती समोर आली. पटेलीयाकडून लाकुड कटाई करून त्याची फर्निचर तयार करणाºयांना विक्री केली जात असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात लाकूड जप्त करण्यात आले.