शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाई

By admin | Updated: November 10, 2014 22:47 IST

जिल्हा वार्षिक योजनेमधून विविध योजनांसाठी ८६ कोटी ३६ लक्ष रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला आहे. त्यानुसार विभागप्रमुखांच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वर्धा : जिल्हा वार्षिक योजनेमधून विविध योजनांसाठी ८६ कोटी ३६ लक्ष रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला आहे. त्यानुसार विभागप्रमुखांच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विभाग प्रमुखांकडे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी खर्च करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांचीच असून विकास कामे निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी एन. नविन सोना यांनी दिल्यात. शिवाय या कामात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे संकेतही त्यांनी दि लेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत विविध विभागांना मंजूर झालेला निधी व झालेल्या खर्चाचा आढावा जिल्हाधिकारी एन. नविन सोना यांनी घेतला. जिल्हा वार्षिक नियोजन आढावा बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात.विभागप्रमुखांना उपलब्ध करून देण्यात आलेला निधी खर्च करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांचीच असल्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेमध्ये प्रस्तावित केलेल्या व मंजूर झालेल्या योजनेसंदर्भात तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे आवश्यक असताना विभाग प्रमुखांकडून अद्याप निधी खर्च झाला नाही. ज्या विभागाकडून निधी खर्च होणार नाही त्याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे सांगताना जिल्हाधिकारी म्हणाले की ज्या योजनांवर निधी खर्च होऊ शकत नाही, असा निधी विभागाने परत करावा.जिल्हा वार्षिक योजनेमध्ये विकास कामे घेताना विकास कामासंदर्भातील संपूर्ण माहिती सादर करणे आवश्यक असताना विभाग प्रमुखाकडून माहिती उपलब्ध होत नाही. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कृषी, वीज, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम, मृदसंधारण, फलोत्पादन, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, नगर परिषद आदी विभागांनी विकासासाठी प्राप्त झालेला निधी खर्च करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्यात. जिल्हा नियोजन भवनासाठी निधी मंजूर झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधकामासंदर्भातील आराखडे तत्काळ सादर करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी स्वागत करून खर्चासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. (प्रतिनिधी)