कारवाईत ५५ दुकाने भुईसपाट

By Admin | Updated: January 14, 2017 01:35 IST2017-01-14T01:35:26+5:302017-01-14T01:35:26+5:30

गत दोन दिवसांपासून शहरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात आहे. यात शुक्रवारी डॉ. बाबासाहेब

In the action 55 shops in the ground floor | कारवाईत ५५ दुकाने भुईसपाट

कारवाईत ५५ दुकाने भुईसपाट

साडेसहा हजारांचा दंड वसूल : नगर पालिकेकडून अतिक्रमण हटाव
वर्धा : गत दोन दिवसांपासून शहरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात आहे. यात शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बजाज चौकापर्यंतचे रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. यात सुमारे ५५ दुकाने हटविण्यात आली असून पक्के बांधकाम जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आले. या कारवाईत ६ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
शहरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे अनेक रस्ते अरूंद होत आहेत. रस्ते मोकळे करण्यासाठी वर्धा नगर पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Web Title: In the action 55 shops in the ground floor