गतिरोधकामुळे अपघात, दोघी बचावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:12 IST2018-04-19T00:12:27+5:302018-04-19T00:12:27+5:30
वर्धा-नागपूर महामार्गावर विद्याभारती कॉलेजजवळ गतिरोधक तयार करण्यात आले; पण पांढरे पट्टे मारले नसून सांकेतिक फलकही नाही. यामुळे अपघात होतात. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांच्या कुटुंबातील महिला कारने नागपूरकडे जात असता चालकाने गतिरोधकावर वेग कमी केला.

गतिरोधकामुळे अपघात, दोघी बचावल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : वर्धा-नागपूर महामार्गावर विद्याभारती कॉलेजजवळ गतिरोधक तयार करण्यात आले; पण पांढरे पट्टे मारले नसून सांकेतिक फलकही नाही. यामुळे अपघात होतात. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांच्या कुटुंबातील महिला कारने नागपूरकडे जात असता चालकाने गतिरोधकावर वेग कमी केला. दरम्यान, मागाहून येणाऱ्या ट्रकने कारला जबर धडक दिली. हा अपघात बुधवारी दुपारी झाला. यात कारचे नुकसान झाले; पण सुदैवाने दोन्ही महिला बचावल्या.
कार क्र. एमएच ३२ वाय १२२१ ने सराफ कुटुंबातील दोन महिला नागपूरला जात होत्या. चालक सुमित खोडके याने गतिरोधकाजवळ वेग कमी केला. यावेळी मागाहून येणाºया भरधाव ट्रक क्र. एमएच ४० एके १८८५ ने कारला जबर धडक दिली. यात सुदैवाने कारमधील सपना शैलेश सराफ व शिल्पा शेखावत रा. वर्धा यांना दुखापत झाली नाही. सराफ यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. तत्पूर्वी सेलू पोलिसांना माहिती देऊनही बराच वेळ एकही पोलीस पोहोचला नाही. सराफ सेलूत आल्यावर त्यांनी वाहनासह पोलीस ठाणे गाठले.
विद्याभारती महाविद्यालय परिसरात आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. येथील गतिरोधक काढून टाकावे वा सांकेतिक फलक तथा गतिरोधकावर ठळक दिसेल असे दूरपर्यंत पांढरे, पिवळे पट्टे मारावे, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.