अल्पवयीन मुलाकडून तीन मुलींसह दोन मुलांवर अतिप्रसंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:13 IST2019-07-28T22:13:01+5:302019-07-28T22:13:45+5:30
येथील आर्वी नाका परिसरातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन असलेल्या तीन मुलींसह दोन मुलांवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आरोपी मुलाचे हे कृत्य आरोपीच्याच आजीच्या लक्षात येताच रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

अल्पवयीन मुलाकडून तीन मुलींसह दोन मुलांवर अतिप्रसंग
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील आर्वी नाका परिसरातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन असलेल्या तीन मुलींसह दोन मुलांवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आरोपी मुलाचे हे कृत्य आरोपीच्याच आजीच्या लक्षात येताच रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणातील आरोपीची न्यायालयाच्या आदेशावरून बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, आर्वी नाका परिसरातील रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय मुलाने तीन अल्पवयीन मुलींसह दोन अल्पवयीन मुलांवर अतिप्रसंग केला. आरोपीचे हे कृत्य आरोपीच्या आजीला लक्षात येताच अनेकांच्या भूवयाच उंचावल्या होत्या. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. मागील दीड वर्षांपासून हा अल्पवयीन मुलगा पीडित अल्पवयीन मुलींसह मुलांवर हे कृत्य करीत होता, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरक्षक सुरज तेलगोटे करीत आहेत.
पीडितांचे नोंदविणार बयान
सदर प्रकरणाचा तपास रामनगर पोलीस करीत असून पीडितांचे बयान पोलिसांकडून नोंदविण्यात येणार आहे.