मोबाईलवरील ‘इंटरनेट’ सुविधेचा विद्यार्थ्यांकडून गैरवापर
By Admin | Updated: July 23, 2014 00:08 IST2014-07-23T00:08:45+5:302014-07-23T00:08:45+5:30
आधुनिक काळात ग्रामीण भागातही मोबाईलवर ‘टु जी’, ‘थ्री जी’सारख्या इंटरनेट सेवा विविध कंपन्यांद्वारे दिल्या जात आहेत़ यामुळे आता प्रत्येक मोबाईलवर इंटरनेट वापरणे शक्य झाले आहे़

मोबाईलवरील ‘इंटरनेट’ सुविधेचा विद्यार्थ्यांकडून गैरवापर
वायगाव (नि़) : आधुनिक काळात ग्रामीण भागातही मोबाईलवर ‘टु जी’, ‘थ्री जी’सारख्या इंटरनेट सेवा विविध कंपन्यांद्वारे दिल्या जात आहेत़ यामुळे आता प्रत्येक मोबाईलवर इंटरनेट वापरणे शक्य झाले आहे़ या इंटरनेट सुविधेचा विद्यार्थी व युवक मात्र गैरवापर करीत असल्याचे दिसून येत आहे़ पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़
ग्रामीण भागातील युवकदेखील इंटरनेटच्या सुविधेने वेडावल्याचे दिसून येते़ तंत्रज्ञानात झपाट्याने होणाऱ्या बदलामुळे मानवी जीवन अधिक सुखकर झाले, यात शंका नाही़ सोशल मिडीया काही युवक-युवतींच गरजच बनली आहे़ व्हाट्सअप, फेसबुक या माध्यमाने तरुणाई जगात सुरू असलेल्या सर्व घडामोडींशी कनेक्ट असते; पण तिच तरुणाई या साधनांचा मोठ्या प्रमाणात दुरूपयोग करताना दिसते़ इंटनेटद्वारे अश्लील व्हीडीओ पाहणे, अश्लील मॅसेज शेअर करणे, फोटोशी खेळ करून विक्षीप्त प्रकार करणे असे अनेक वाईट वापरही केले जातात़ आपला पाल्य मोबाईलमधील इंटरनेटचा कसा वापर करताये, हे तपासण्याची दक्षता पालक घेत नसल्याने दुरूपयोग वाढल्याचे दिसते़
व्हाट्स अप, फेसबुक व ग्रुपमध्ये कोण आहे, दररोज कशाची देवाण- घेवाण होते याची माहिती ठेवणे गरजेचे झाले आहे़ आपल्या मुला-मुलीने जगासोबत चालावे, नवीन तंत्रज्ञान त्यांना लवकर अवगत व्हावे, धकाधकीच्या या युगात त्यांनी कुठेही मागे राहू नये यासाठी अनेक पालक मुला-मुलींना महागडे मोबाईल विकत आणून देतात़ यात प्रत्येक महिन्याला इंटरनेट सुविधेसाठी रिचार्ज मारून दिले जाते; पण मुले या सुविधेचा वापर शिक्षणासंबंधी माहिती गोळा करण्यासाठी करतात वा नाही, हे तपासले जात नाही़ पालकांनी मुलांच्या मोबाईल वापराकडे लक्ष देत विकृत मनोवृत्तीला आळा घालणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)