In the absence of a building, in the shade of a tree, external examination is done | इमारतीअभावी झाडाच्या सावलीत होतेय बाह्य रुग्णतपासणी

इमारतीअभावी झाडाच्या सावलीत होतेय बाह्य रुग्णतपासणी

ठळक मुद्देतळेगावच्या आरोग्य केंद्रातील प्रकार : इमारत बांधकाम कासवगतीनेच

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (टा) : कंत्राटदाराकडून आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम कासवगतीने केले जात असल्याने सध्या येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना त्यांच्या निवासस्थानापुढील मोकळ्या जागेवर बाह्य रुग्णसेवा द्यावी लागत आहे. विशेष म्हणजे याकडे जि.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
तळेगाव (टा.) हे दहा हजार लोकसंख्येचे गाव. शिवाय विविध साहित्याची गरज पडल्यास परिसरातील गावांमधील नागरिक याच गावात येतात. परिणामी, येथे आरोग्य केंद्राची सुसज्ज व्हावी या हेतूने मोठा निधी खेचून आणण्यात आला. शिवाय निधी प्राप्त झाल्यावर प्रत्यक्ष कामालाही सुरूवात झाली. परंतु, अद्यापही आरोग्य केंद्राची इमारत पुर्ण न झाल्याने रुग्णांसह डॉक्टरांना नाहक त्रास सहन करावी लागत आहे. परिसरातील सुमारे १५ गावांमधील नागरिक येथे शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येतात.
सध्याच्या कोरोना काळातही या ठिकाणी दररोज शंभरहून अधिक रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत. परंतु, सुसज्ज इमारत तयार न झाल्याने शासकीय निवासस्थानाच्या आवारातच झाडाच्या सावलीत डॉक्टरांना रुग्णांची आरोग्य तपासणी करावी लागत आहे. विशेष म्हणजे येथे कार्यरत असलेले डॉक्टर कोरोना काळाची जाणीव बाळगून रविवारी म्हणजे सुटीच्या दिवशीही रुग्ण तपासणी करीत आहेत.

कीटकजन्य आजार काढतोय डोके वर
सप्टेंबर महिन्यात गावात आणि परिसरात कीटकजन्य आजाराने डोकेवर काढले होते. त्यावेळी एका लोकप्रतिनिधीने जिल्हा परिषदेतील बड्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यावर गावात विशेष मोहीम राबविण्यात आली. पण अजूनही या गावासह परिसरातील गावांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आढळून येत असल्याने पुन्हा एकदा किटकजन्य आजार डोकेवर काढू पाहत असल्याचे बोलले जात आहे.

तळेगाव (टा.) येथील आरोग्य केंद्रातील डॉ. अमर करतारी हे ग्रामस्थांसह परिसरातील गावांमधील नागरिकांना कोरोना काळातही २४ तास आरोग्य सेवा देत आहेत. परंतु, आरोग्य केंद्राच्या अर्धवट इमारतीमुळे त्यांच्यासह त्यांच्या सहकार्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाºयांनी इमारतीचे बांधकाम करणाºया कंत्राटदाराच्या मनमर्जीला वेळीच ब्रेक लावला पाहिजे.
- अतुल तिमांडे, माजी सरपंच, तळेगाव (टा.).

Web Title: In the absence of a building, in the shade of a tree, external examination is done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.