लग्नाचे आमिष देत फरार युवक गजाआड

By Admin | Updated: December 3, 2015 02:27 IST2015-12-03T02:27:20+5:302015-12-03T02:27:20+5:30

लग्नाचे आमिष देत फसवणारा आजनडोह येथील एक युवक तब्बल एक वर्षाने पोलिसांना गवसला.

The absconding youth freed the marriage lover | लग्नाचे आमिष देत फरार युवक गजाआड

लग्नाचे आमिष देत फरार युवक गजाआड


कारंजा (घा.) : लग्नाचे आमिष देत फसवणारा आजनडोह येथील एक युवक तब्बल एक वर्षाने पोलिसांना गवसला. पोलिसांनी त्याला शिताफीने काटोल येथून त्याच्या नातेवाईकाकडून ताब्यात घेतले. मंगेश नत्थूजी नेहारे (२७), असे आरोपीचे नाव आहे.
मंगेश याचे गावातील एका युवतीवर प्रेम होते. मुलीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्याच्याशी शरीर संबंध प्रस्तापित केले. यातून तिला गर्भधारणा झाली. यानंतर तिने त्याच्याकडे लग्नाचा आग्रह धरला; पण त्याने लग्नास नकार दिला. याबाबत अखेर तिने ११ आॅक्टोबर २०१४ रोजी कारंजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आजनडोह येथून त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला; पण तो पसार झाला होता. एक वर्ष युवती व पोलिसांना हुलकावणी देत तो फरार होता. माहिती मिळाल्याने पोलिसांनी सोमवारी साहूर गाठले; पण तो तेथूनही फरार झाला. काटोलकडे गेल्याचे कळताच पोलिसांनी रात्री त्याला ताब्यात घेतले. बुधवारी न्यायालयात हजर केले असता गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. ही कारवाई ठाणेदार विनोद चौधरी, जमादार बंडू महाकाळकर व मनोज खरबरे यांनी पार पाडली.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The absconding youth freed the marriage lover