शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

संस्थाध्यक्षांकडून ९५ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 6:00 AM

स्थानिक नंदोरी चौक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहेत. शिवाय समाजातील सर्वच स्तरातून घटनेचा निषेध केल्या जात आहे. मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालयात पीडिता ही वनस्पती शास्त्राची तासिका तत्त्वावर प्राज्ञापक होती. घटनेच्या दिवशी ती नेहमी प्रमाणे महाविद्यालयात जात असताना ही घटना घडली. या घटनेची माहिती स्वप्नील भांडारवार यांनी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर यांना दिली.

ठळक मुद्देपीडितेच्या कुटुंबाला दिलासा : थेट एटीएम कार्डच ठेवले होते रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील जळीत प्रकरणातील जखमी प्राध्यापिकेवर नागपूर येथील महागड्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, तेथील खर्च या कुटुंबाला झेपावणारा नसल्याचे लक्षात येताच संस्थाध्यक्ष पांडुरंग तुळसकर यांनी पीडितेच्या उपचारासाठी आर्थिक मदत दिली आहे. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांना थोडा का होईना पण दिलासा मिळाला आहे.स्थानिक नंदोरी चौक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहेत. शिवाय समाजातील सर्वच स्तरातून घटनेचा निषेध केल्या जात आहे. मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालयात पीडिता ही वनस्पती शास्त्राची तासिका तत्त्वावर प्राज्ञापक होती. घटनेच्या दिवशी ती नेहमी प्रमाणे महाविद्यालयात जात असताना ही घटना घडली. या घटनेची माहिती स्वप्नील भांडारवार यांनी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर यांना दिली. त्यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय गाठले. त्यांच्या मागेच त्यांचे बंधु शल्यविशारद डॉ. निलेश तुळसकर सुद्धा रुग्णालयात पोहचले. त्यांनी जखमीची पाहणी केली. तिला सुजन येत असल्याचे पाहून अन्न नलिकेतुन श्वसनाचा त्रास होऊ शकतो, असे निदान केले. तातडीने नागपूरला पाठविण्याचा निर्णय घेतला. यावेळी पीडितेची मानसिक स्थिती पाहून उमेश तुळसकर मोठ्या रुग्णालयात उपचाराचे तिला अस्वासन देऊन रुग्णवाहिकेतून नागपूरला पाठविले. त्यावेळी पीडितेची आत्या व प्रा. अश्विनी चौधरी या दोघी तिच्या सोबत होत्या. त्यांच्या मागेच संस्थाध्यक्ष पांडुरंग तुळसकर, पीडितेचे आई-वडील, मुख्याद्यापक नितीश रोडे, शिक्षक सिडामे रुग्णालयात पोहचले. उपचार सुरू झाला; पण रुग्णालयात पैसे भरणे आवश्यक असल्याचे पाहून प्राचार्य तुळसकर यांनी तातडीने ४५ हजार रुपये भरले. शिवाय २५ हजार रुपये किंमतीचे औषध आणले. ते इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी आपले एटीएम कार्ड शिक्षकांजवळ देऊन औषधोपचारासाठी यातून खर्च करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. पीडितेच्या वडिलांनी ही १५ हजार रुपये भरले. सायंकाळी ५ हजाराची औषध देऊन तिच्या वडिलांकडे १० हजार रोख ठेवल्याचे व परततांना त्यांनी आपले एटीएम कार्ड शिक्षकांजवळ देऊन यातून खर्च करण्याची सूचना केल्याचे प्राचार्य तुळसकर यांनी सांगितले. शासनाचा मदतनिधी बुधवारी सकाळी ११ वाजता दोन दिवसानंतर पोहचला. शासनाच्या तोंडी सूचना ऐकण्यास रुग्णालय प्रशासन तयार नव्हते. महाविद्यालय प्रशासन पीडितेच्या पाठीशी असल्याने तिच्या उपचारासाठी पैशाची उणीव भासली नाही. भविष्यात पीडितेला सहकार्य करण्याची भावना पांडुरंग तुळसकर यांनी व्यक्त केली आहे.मनसेच्या जिल्हाप्रमुखांकडून पीडितेच्या कुटुंबीयांची विचारपूसघटनेच्या दिवशी मनसेच्या शाखा प्रमुखाने पीडित युवतीस येथील शासकीय रुग्णालयात पोहोचविले. त्यानंतर बुधवारी सकाळी मनसेचे जिल्हा प्रमुख अतुल वांदीले यांनी नागपूर गाठून पीडितेच्या आई-वडिलांची भेट घेत पीडितेच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. शिवाय कुठलीही मदत लागल्यास आम्हाला कळवा आम्ही त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी