शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
4
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
5
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
6
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
7
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
8
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
9
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
10
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
11
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
12
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
13
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
14
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
15
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
16
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
17
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
18
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
19
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
20
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार

९ महिन्यांची बालिका घेऊन पळालेला पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:10 AM

चॉकलेटच्या बाहाण्याने ९ महिन्याच्या बालिकेला घेऊन पसार झालेल्या आरोपीला काही तासातच अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली. निलेश कमलाकर अंबाडरे (३१) रा. तहसील वॉर्ड, हिंगणघाट असे आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देबालिका सुखरूप : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चॉकलेटच्या बाहाण्याने ९ महिन्याच्या बालिकेला घेऊन पसार झालेल्या आरोपीला काही तासातच अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली.निलेश कमलाकर अंबाडरे (३१) रा. तहसील वॉर्ड, हिंगणघाट असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी विद्या अनंतराव नेहारे रा. नाचणगांव या घरी असताना त्यांच्या बहिणीचा दीर निलेश हा १८ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता त्यांच्या घरी गेला. त्याने विद्या यांना सोबत चलण्याचा आग्रह केला. जाण्यास नकार दिल्याने निलेशने त्यांची लहान मुलगी अनुश्री हिला चॉकलेट घेऊन देतो, असे सांगून सोबत घेऊन गेला. बराच वेळ झाल्यावर परतला नसल्याने शोधाशोध केली असता कुठेही दिसून आले नाही, अशी तक्रार त्यांनी पुलगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. बालिका ९ महिन्याची असल्यामुळे तिच्या जीवाला धोका होण्याची संभावना होती. म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक नीलेश ब्राह्मणे यांना या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. यावरुन तपासाकरिता २ अधिकारी व तीन पथक नेमले. हे पथक पुलगांव व हिंगणघाट येथे पाठविण्यात आले. आरोपी हिंगणघाट तालुक्यातील वालदूर येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने लगेच गाव गाठून आरोपीला बालिकेसह ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार महेंद्र इंगळे, आशिष मोरखेडे, दिवाकर परीमल, परवेज खान, दीपक जाधव, आनंद भस्मे, दिनेश बोथकर, राकेश आष्टनकर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस