९,५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:44 IST2017-11-03T23:44:28+5:302017-11-03T23:44:39+5:30

कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे; परंतु, त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. प्रदूषणाचे एक कारण असलेल्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी वर्धा नगर पालिकेच्या विशेष पथकाने....

9, 500 kg plastic bags seized | ९,५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

९,५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

ठळक मुद्देदोघांना ७५ हजाराचा दंड : वर्धा पालिकेच्या विशेष पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे; परंतु, त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. प्रदूषणाचे एक कारण असलेल्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी वर्धा नगर पालिकेच्या विशेष पथकाने मारोती ट्रेडींग कंपनीच्या गोदामावर शुक्रवारी छापा टाकून कमी जाडीच्या ९ हजार ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. जप्त केलेला सदर मुद्देमाल सुमारे पाच लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.
वर्धा नगर पालिकेच्यावतीने गत दोन दिवसांपासून शहरात प्लास्टिक निर्मुलनासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. पहिल्या दिवशी पालिका कर्मचाºयांनी काही छोट्या व्यावसायिकांना २० हजारांचा तर दुसºया दिवशी १५ हजारांचा दंड ठोठावला होता. आज पालिकेच्या या पथकातील कर्मचाºयांनी इतवारा बाजार परिसरात छापा टाकून एका व्यावसायिकाकडून कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्या जप्त केल्या. प्लास्टिकच्या पन्नी आढळलेले हे गोदात मारोती ट्रेडींग कंपनीचे राजेश बुधवानी यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले आहे. या गोदामातून पालिकेच्या कर्मचाºयांनी सुमारे पाच लाख रुपये किंमतीच्या ९ हजार ५०० किलो कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहे. शिवाय सदर व्यावसायिकाकडून ७० हजारांचा दंड वसूल केला. या कारवाईपूर्वी इतवारा बाजार चौकातील हरिष धामिचा या व्यावसायिकाकडून ५ हजारांचा दंड वसूल केला. ही कारवाई न.प. सीईओ अश्विनी वाघमळे, प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, प्रवीण बोरकर, अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, स्रेहा मेश्राम, नवीन गोन्नाडे, गुरूदेव हटवार, लंकेश गोडेकर आदींनी केली.

Web Title: 9, 500 kg plastic bags seized