कारसह देशी दारूच्या ८६४ बाटल्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:05 IST2019-05-15T21:04:45+5:302019-05-15T21:05:31+5:30
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाचणगांव चौरस्ता येथे नाकेबंदी करून प्रवीण नरेश नाईक (४१), रा.पंचशील नगर, पुलगांव याला त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारूती स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन आणि देशी दारूने भरलेल्या ८६४ निपा असा एकूण ५ लाख ५१ हजार ८४० रूपयाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली.

कारसह देशी दारूच्या ८६४ बाटल्या जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाचणगांव चौरस्ता येथे नाकेबंदी करून प्रवीण नरेश नाईक (४१), रा.पंचशील नगर, पुलगांव याला त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारूती स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन आणि देशी दारूने भरलेल्या ८६४ निपा असा एकूण ५ लाख ५१ हजार ८४० रूपयाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली.
प्रवीण नाईक हा वाहन क्रमांक एम.एच.३१ डी.के.२८७२ मध्ये देशी दारूने भरलेल्या ८६४ शिशा घेऊन दारूची अवैध वाहतुक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नाकेबंदी करून पोलिसांनी अवैध देशी दारूची वाहतुक करण्याकरीता वापरण्यात आलेली पांढºया रंगाची मारूती स्विफ्ट डिझायर चारचाकी जप्त करून आरोपी विरूध्द दारूबंदी कायद्यातर्गंत गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.बसवराज तेली, निखील पिंगळे, दिनेशकुु मार कोल्हे, रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात अहफास सैयद, अशोक भोयर, विवेक बनसोड, संदीप एकबोटे, अनिल भोवरे, पवन निलेकर, विकास मुंडे आणि राकेश शिवणकर यांनी केली.