१०० रुपयांत ८०० मिली रॉकेल मिश्रित पेट्रोल
By Admin | Updated: February 12, 2015 01:33 IST2015-02-12T01:33:29+5:302015-02-12T01:33:29+5:30
शहरासह ग्रामीण भागात रॉकेल मिश्रीत पेट्रोलची सर्रास विक्री सुरू आहे़ पेट्रोलचे दर कमी झाले असले तरी नागरिकही किरकोळ विक्रेत्यांना प्राधान्य देतात़...

१०० रुपयांत ८०० मिली रॉकेल मिश्रित पेट्रोल
कारंजा (घा़) : शहरासह ग्रामीण भागात रॉकेल मिश्रीत पेट्रोलची सर्रास विक्री सुरू आहे़ पेट्रोलचे दर कमी झाले असले तरी नागरिकही किरकोळ विक्रेत्यांना प्राधान्य देतात़ याचाच फायदा घेत किरकोळ विक्रेते १०० रुपयांत ८०० मिलीच पेट्रोल देतात़ यातही रॉकेलची भेसळ केली जाते. पेट्रोल पंपावरून किरकोळ विक्रेत्यांना बॅरलमध्ये पेट्रोल उपलब्ध करून दिले जात असून संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
सध्या पंपावरील पेट्रोलचे दर ६३ रुपये आहेत; पण हेच पेट्रोल खुल्या बाजारात किरकोळ विक्रेत्यांकडे १२० रुपयांत पडते़ पेट्रोलपंप जवळ नसल्याने हा भुर्दंड ग्रामीण नागरिक सहनही करतात; पण शहराला एक किमी अंतरावर पेट्रोलपंप असतानाही याच पेट्रोलला पसंती दिली जाते़ यातून सुशिक्षीत बेरोजगारांना तात्पुरता व्यवसाय उपलब्ध होत आहे; पण या पेट्रोलमध्ये रॉकेलची भेसळ केली जाते़ यामुळे दुचाकींमध्ये बिघाड येतो़ शहरात खुलेआम हे पेट्रोल विकले जाते़ रॉकेलचा काळाबाजारही सर्रास सुरू आहे. चारचाकी वाहनांत रॉकेलचा वापर केला जातो़ गरिबांचे हे इंधन गरजुंना वेळेवर उपलब्ध होत नाही; पण चारचाकी वाहनांना चढ्या दराने विकले जाते़ परवाना धारक विके्रते केरोसीनची उचल करताना परस्पर विक्रीही करतात़ संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असून आळा घालणे गरजेचे आहे़(शहर प्रतिनिधी)