शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

८ हजार ९७० शिक्षकांना मिळणार वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने १३ डिसेंबर रोजी विधी मंडळावर दंडवत महामोर्चा काढण्यात आला. तिसऱ्या दिवशी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सदर शिक्षक, कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली. यामुळे राज्यातील ८ हजार ९७० शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग १७ वर्षानंतर मोकळा झाला आहे.१ व ...

ठळक मुद्दे१७ वर्षांची प्रतीक्षा संपली : विना अनुदानित शिक्षकांत समाधान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने १३ डिसेंबर रोजी विधी मंडळावर दंडवत महामोर्चा काढण्यात आला. तिसऱ्या दिवशी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सदर शिक्षक, कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली. यामुळे राज्यातील ८ हजार ९७० शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग १७ वर्षानंतर मोकळा झाला आहे.१ व २ जुलै २०१६ रोजी मूल्यांकन करून अनुदानास १५८ प्राथमिक शाळा ५०४ तुकड्यांवरील १४१७ शिक्षक, ६३१ माध्यमिक शाळा व १६०५ तुकड्यांवरील ५३७६ शिक्षक आणि २१८० शिक्षकेतर कर्मचारी, अशा एकूण ८,९७० शिक्षक, कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान देण्याची तथा आॅनलाईन मूल्यांकन झाल्यानंतर अनुदानास पात्र प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या यांची यादी अधिवेशन संपण्यापूर्वी जाहीर करण्याची घोषणा शिक्षणमंत्री तावडे यांनी विधान परिषदेत केली. या घोषणेनंतर तीन दिवस नागपूर येथील एलआयसी चौकात सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्थगीत करण्यात आले. आंदोलन यशस्वी करण्याकरिता शिक्षक आ. नागो गाणार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे, इतर शिक्षक व पदवीधर आमदारांनी सहकार्य केले.१७ वर्षानंतर ८ हजार ९७० शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. आंदोलनात विना अनुदानित शाळा कृती समितीचे अजय भोयर, मनीष मारोटकर, शैलेश भोसले, अमित प्रसाद, प्रकाश खाडे, किशोर चौधरी, सिद्धार्थ वाणी, मोहम्मद ईझारुद्दीन, रमेश टपाले, राजू कारवटकर, देवीदास गावंडे, संजय चौधरी, गजानन भेदुरकर, माधुरी मेश्राम, प्रवीण डेकाटे, चित्रा चांदेकर यासह अन्य शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :Teacherशिक्षक