कारंजात ६ हजार ९८८ बालकांना पोलिओ डोज पाजणार

By Admin | Updated: February 21, 2016 01:29 IST2016-02-21T01:29:48+5:302016-02-21T01:29:48+5:30

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २१ फेब्रुवारी २०१६ अन्वये तालुका टास्क फोर्सची समन्वय सभा तहसीलदार एस.जे. मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

6718 children will be polio dosage in cars | कारंजात ६ हजार ९८८ बालकांना पोलिओ डोज पाजणार

कारंजात ६ हजार ९८८ बालकांना पोलिओ डोज पाजणार

आज पल्स पोलिओ लसीकरण : ९९ गावांत १०४ बुथवर सुविधा
कारंजा (घा.) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २१ फेब्रुवारी २०१६ अन्वये तालुका टास्क फोर्सची समन्वय सभा तहसीलदार एस.जे. मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर मोहिमेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र सारवाडी आणि कन्नमवारग्राम मिळून तालुक्यातील एकूण ९९ गावांतील १०४ बुथमार्फत ६ हजार ९८८ बालकांना पल्स पोलिओचा डोज पाजण्यात येणार आहे.
तालुक्यातील ३५२ कर्मचारी व ३५ पर्यवेक्षक ही मोहीम सांभाळणार आहेत. तालुक्यातील सर्व पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोज पाजण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांनी दिली. रविवार सर्व बुथ, ट्रांसिट आणि मोबाईल टीम या सकाळी ८ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच या दिवशी सुटलेल्या लाभार्थ्यांना २३ ते २५ फेब्रुवारीला घरोघरी जावून डोज पाजण्यात येणार आहे. याकरिता गावोगावी सूचित करण्याबाबत खंडविकास अधिकारी बी. डब्ल्यू यावले यांनी सूचित केले.
सभेला समिती सदस्य म्हणून ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुमित अंबादे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बाके, डॉ. एम. के. चापे, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी ए. जी. महाडीक, नगर पंचायत प्रतिनिधी अशोक जसुतकर, गटशिक्षण अधिकारी प्रतिनिधी डी. आर. उंबरकर, पर्यवेक्षक व्ही. ए. गिरे उपस्थित होते. एकही बालक पोलिओ डोजपासून वंचित राहू नये यासाठी सदर मोहीम जोरकसपणे राबविली जात आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: 6718 children will be polio dosage in cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.