शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार शेतकऱ्यांना ६.७१ कोटींची मदत

By admin | Updated: February 9, 2015 23:18 IST

खरीप हंगाम २०१४ मध्ये अतिवृष्टी आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या कारंजा तालुक्यातील १२० गावातील १६ हजार १०१ शेतकऱ्यांना ६ कोटी ७१ लाख ७५ हजार रूपयाची मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे.

अरुण फाळके - कारंजा(घा.)खरीप हंगाम २०१४ मध्ये अतिवृष्टी आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या कारंजा तालुक्यातील १२० गावातील १६ हजार १०१ शेतकऱ्यांना ६ कोटी ७१ लाख ७५ हजार रूपयाची मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे. रकमेचे धनादेश संबंधित बँकांना पाठविण्यात आले आहे. मदतीची रक्कम ६७ टक्के असून, कारंजाचे तहसीलदार राजेंद्र बालपांडे व त्यांच्या चमुने ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्वरीत मिळावी याकरिता विशेष मोहीम राबविल्याची माहिती आहे. अतिवृष्टी, नापिकी आणि अत्यल्प भाव यामुळे कारंजा तालुक्यातील शेतकरी यावर्षी हवालदील झाला होता. शेतीला लावलेला खर्चही निघालेला नाही. कापसाला भाव नाही. अत्यल्प भावात कापसाची विक्री करावी लागली. सोयाबीनचे भावही अत्यल्प आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकाकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. या सर्वांवर मार्ग निघून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आर्वी विधानसभा मतदार संघाचे आमदार अमर काळे यांनी विधानसभेवर आर्वी ते नागपूर अशी पदयात्रा आढली. विदारक परिस्थितीची जाणीव सरकारला करून दिली. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत शासनाने जाहीर केली आहे. कारंजा तालुक्यात १२० गावे आहेत. यातील ११ हजार ६०३ अल्पभूधारक तर ४ हजार ४९८ बहुभूधारक दुष्काळाचे बळी ठरले होते. अल्पभूधारकांची ८ हजार ३०१ हेक्टर तर बहूभूधारकांची ४ हजार ४९८ हेक्टर शेतजमीन बाधित झाली होती. शासनाने मदतीचा हात पुढे करून अल्पभूधारकांना ४ कोटी ३१ लाख १८, हजार ७७० रू. तर बहुभूधारकांना २, कोटी ४० लाख ५६ हजार २३० रुपये अशी एकूण ६ कोटी ७१ लाख ७५ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. कोरडवाहूला प्रतिहेक्टर ४ हजार ५०० रू., बागायतीला ९ हजार रुपये तर संत्रा उत्पादकाला १२ हजार रू. प्रतिहेक्टर मतदीचा दर होता. सर्व लाभधारकांची रक्कम धनादेशाद्वारे संबंधित बँकाकडे पाठविली असून आता बँकांनी प्रत्येक लाभधारकांच्या खात्यात रक्कम वळती करावी, अशी मागणी आहे. परंतु काही बँका यासाठी टाळाटाळ करीत आहे.