६.४५ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
By Admin | Updated: January 31, 2015 01:56 IST2015-01-31T01:56:25+5:302015-01-31T01:56:25+5:30
सुगंधित तंबाखू विकत असल्याच्या माहितीवरून दारूबंदी विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांसह अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात गुरूवारी कारवाई केली.

६.४५ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
देवळी : सुगंधित तंबाखू विकत असल्याच्या माहितीवरून दारूबंदी विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांसह अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात गुरूवारी कारवाई केली. यात येथील तीन दुकानांतून ६ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्य एका दुकानाचा मालक पोलीस कारवाईच्या भीतीने फरार झाल्याचे म्हणत त्याच्या दुकानाला सील लावण्यात आले; पण शुक्रवारी सकाळी त्याच्या दुकानाला लावलेले सिल काढून तपासणी केली असता त्याच्या घरात काहीही सापडले नाही.
पोलीस तथा अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शहरात गुरूवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. रात्री तीन दुकानांमध्ये कारवाई करण्यात आली तर एक दुकानदार बाहेरगावी गेला असताना तो फरार असल्याचे दाखविण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सतीश नंदनवार यांच्या मालकीच्या दुकानामध्ये ३ लाख १५ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू मिळून आला तर राजेंद्र सावरकरच्या दुकानात २ लाख २५ हजार रुपये तसेच सुरेश पटेल याच्या दुकानातून १ लाख ५ हजार रुपयांचा सुगंधीत तंबाखू व गुटखा जप्त करण्यात आला.
सील केलेल्या दुकानाची आज सकाळी सिल काढून तपासणी केली असता त्यात काहीही सापडले नाही. मादक वस्तूंची साठवणूक तसेच वितरण करण्यावर शासनाची बंदी घातली असता देवळी येथे या मालाची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत होती. हा प्रकार खुलेआम सुरू असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी देवळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)