शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

५.३७ लाखांचा जुगार

By admin | Updated: September 25, 2016 02:01 IST

येथील सावंगी (मेघे) बायपासवर असलेल्या हॅपी टॉवर परिसरात जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत १८ जणांना अटक करण्यात आली.

१८ जणांना अटक : सावंगी येथील घटनावर्धा : येथील सावंगी (मेघे) बायपासवर असलेल्या हॅपी टॉवर परिसरात जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत १८ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून १ लाख ३२ हजार ५४० रुपयांच्या रोख रक्कमेसह ५ लाख ३७ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. शेख आसीफ शेख यासीन, शेख अहमद शेख नूर (२९), आकीब शेख जलील शेख (४२), सहेजाद शेख याकुब शेख (२२), इम्रान शेख जब्बार शेख (२४), जिमीत हिम्मतकुमार व्यास (२८), शेख अहेमद शेख रशीद (२८), शेख रज्जब शेख जलील (२२), मोहम्मद उस्मान मोहम्मद मजहर (२६), शेख आबीद शेख इब्राहीम (२९), कृष्णा बनवारीलाल जोशी (२४), जाबाद शेख शाकीब शेख (२१), भारत संपत कळमकर (४९), शेख सलीम शेख गफार (२२), राजू आदीनाथ सावद (२९), गौरव प्रकाश देशमुख (२४), अकील अहेमद रकीब अहेमद (३५) आदींना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस सुत्रानुसार, यवतमाळ-नागपूर बायपासवर असलेल्या हॅपी टॉवर येथे जुगार सुरू असल्याची माहिती ठाणेदार संतोष शेगावकर यांना मिळाली. त्यांनी मिळालेल्या माहितीवरून हॅपी टॉवर येथे धाड घातली. येथे अटकेत असलेले १८ जण ५२ ताशपत्त्यावर जुगार खेळत असल्याचे मिळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत रोख १ लाख ३२ हजार ५४०, विविध कंपन्यांचे २२ मोबाईल व दोन दुचाकी असा ५ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मुंबई जुगार कायद्याच्या कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेत असलेल्या १८ ही जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.(प्रतिनिधी)