पाच लाखांची देशी दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 18:19 IST2019-04-28T18:16:31+5:302019-04-28T18:19:22+5:30

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव-मिरी रोडवरील आडगाव शिवारात राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने एका कारमधून ४ लाख ९४ हजार ९२८ रुपयांची देशी दारु जप्त केली़ रविवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़

 5 lakh country liquor seized | पाच लाखांची देशी दारु जप्त

पाच लाखांची देशी दारु जप्त

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव-मिरी रोडवरील आडगाव शिवारात राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने एका कारमधून ४ लाख ९४ हजार ९२८ रुपयांची देशी दारु जप्त केली़ रविवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़
कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन कारचालक फरार झाला़ तिसगाव रोडने अवैधरित्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादनशुल्कच्या पथकाला मिळाली होती़ माहितीनुसार पथकाने आडगाव शिवारात सापळा लावला़ काही वेळातच समोरून एम़एच़ ०४ ई-झेड २१२१ या क्रमांकाची कार आली़ पथकाने ही कार अडविली तेव्हा चालक कारमधून पळून गेला़ यावेळी कारमधून देशी दारुच्या बाटल्यांचे बॉक्स जप्त करण्यात आले़ जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक सी़पी़ निकम, निरिक्षक अनिल पाटील, दुुय्यम निरिक्षक सुजितकुमार क्षीरसागर, जवान दिगंबर ठुबे, उत्तम काळे, संपत बिटके, रत्नमाला काळापहाड यांच्या पथकाने ही कारवाई केली़
 

 

Web Title:  5 lakh country liquor seized