५ लाख ६0 हजार लुटणारी टोळी जेरबंद
By Admin | Updated: May 13, 2014 23:49 IST2014-05-13T23:49:37+5:302014-05-13T23:49:37+5:30
विरूळ (आकाजी) येथील स्टेट बँक ऑफ इंडियातून ५ लाख ६0 हजार रुपये लुटण्यात आले होते. ही घटना गुरुवारी घडली असून ही लुटमार करणारी टोळी पुलगाव पोलिसांनी जेरबंद केली आहे.

५ लाख ६0 हजार लुटणारी टोळी जेरबंद
ंपुलगाव : विरूळ (आकाजी) येथील स्टेट बँक ऑफ इंडियातून ५ लाख ६0 हजार रुपये लुटण्यात आले होते. ही घटना गुरुवारी घडली असून ही लुटमार करणारी टोळी पुलगाव पोलिसांनी जेरबंद केली आहे. लुटमार करताना सोबत असलेला विशाल धोपाडे या सर्व प्रकाराचा मास्टर माईंड असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या दोन साथीदारांना बुलडाणा येथून अटक करण्यात आली असून त्यांचे नाव राजेश खोडे व रविन खोडे असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील चौथा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. घटना अशी की, ८ मे रोजी तक्रारकर्ता हेमंत देविदास जिचकार रा. पुलगाव त्याचा मित्र विशाल धोपाडे विरूळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे जाऊन ५ लाख ६0 हजार रुपये घेऊन येत होते. विशाल धोपाडे याच्या मोटर सायकलने पुलगाव येथे येत असताना या दोघांवर अज्ञात युवकांनी हल्ला केला. यात हेमंत याच्यावर चाकूने हल्ला करून त्याच्याजवळ असलेली पैशाची बॅग चोरट्यांनी लांबविली होती. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांचा संशय विशाल धोपाडे याच्यावर गेला. पोलिसांनी त्याला ताब्यता घेवून पोलिसी हिसका दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात त्याला त्याचे मित्र राजेश खोडे व रविन खोडे दोन्ही रा. पुलगाव यांनी मदत केली. या दोघांनाही खामगाव जिल्हा बुलढाणा येथून अटक केली. त्यांच्या जवळून आतापर्यंत ४ लाख ५0 हजार रुपये व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्यात. यातील चौथा पसार आरोपीचा शोध घेवून अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात पुलागवचे पोलीस निरीक्षक राजेंद्र लाभणे, एम.व्ही चाटे, जमादार प्रकाश लसुंते, दिनेश कांबळे, किशोर लभाने, भारत पिसुड्डे, भारत अलोणे, गुड्ड थूल, कुलदीप ताकसाळे यांनी केली.(शहर प्रतिनिधी)