आर्वी उपविभागात ४ हजार ६०८ लाभार्थी

By Admin | Updated: February 27, 2015 00:01 IST2015-02-27T00:01:04+5:302015-02-27T00:01:04+5:30

खरीप हंगाम २०१४ मध्ये हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत आर्वी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यातील ११२ महसूल मंडळातील ४६०८ ...

4,608 beneficiaries in the Arvi subdivision | आर्वी उपविभागात ४ हजार ६०८ लाभार्थी

आर्वी उपविभागात ४ हजार ६०८ लाभार्थी

आर्वी : खरीप हंगाम २०१४ मध्ये हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत आर्वी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यातील ११२ महसूल मंडळातील ४६०८ शेतकरी कपाशी व सोयाबीन या पिकासाठी काढलेला फळपीक विमा योजनेसाठी लाभार्थी ठरले आहे. त्यांना १.५३ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे.
उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील कपाशी पिकासाठी २ हजार ६३० शेतकऱ्यांचा लाभार्थ्यांत समावेश आहे. त्यांच्यासाठी १ कोटी २० लाख ९ हजार १०४ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सोयाबीन पिकासाठी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील १ हजार ९७८ शेतकरी लाभार्थी ठरले आहे. त्यांच्यासाठी ३८ लाख २२ हजार ६४४ रुपयांचे अनुदान मिळणर आहे. आर्वी तालुक्यात आर्वी, खरांगणा, रोहणा, वाठोडा, विरूळ, आष्टी तालुक्यातील आष्टी, साहूर, तळेगाव तर कारंजा (घा.) तालुक्यात कारंजा, कन्नमवारग्राम, सारवाडी या तीन तालुक्यातील ११ महसूल मंडळाचा समावेश आहे.
तीन वर्षांपासून आर्वी उपविभागात दुष्काळ, नापिकी, खराब हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने शेती व्यवसाय वर्षदर वर्ष तोट्याचा ठरत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना वाढीस लागली आहे. त्यात नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची सर्वत्र आर्थिक लुट सुरू असल्याचे चित्र आहे.(तालुका प्रतिनिधी)
तीनही तालुक्यातील एकूण लाभार्थी
कपाशी पिकासाठी महसूल मंडळ निहाय लाभार्थी शेतकरी आहेत. आर्वी २२७, खरांगणा ८९५, रोहणा ५३१, वाठोडा ३०, विरूळ ३९, आष्टी तालुका आष्टी २३१, साहूर ४४, तळेगाव २३३, कारंजा तालुका कारंजा १८४, कन्नमवारग्राम ७४, सारवाडी ८८ आदी लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश आहे. सोयाबीन पिकासाठी १,९७८ शेतकरी लाभार्थी ठरले आहे. या सोबतच आर्वी १५३, खरांगणा ८६३, रोहणा ५१२, विरूळ १, आष्टी तालुका आष्टी ४६, साहूर १६, कारंजा तालुका कारंजा १५३, कन्नमवारग्राम १४४, सारवाडी ६८ आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: 4,608 beneficiaries in the Arvi subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.